WFI Chief Sanjay Singh: मोठी बातमी! कुस्ती महासंघाची मान्यता रद्द; नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंहांचही निलंबन

Wrestling Fedaration of india: भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह आणि संजय सिंह यांना मोठा धक्का
Brijbhushan Sharan Singh and Sanjay Singh
Brijbhushan Sharan Singh and Sanjay SinghSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून नव्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. याबरोबरच कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झालेले संजय सिंह यांचेही निलंबन करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका काही दिवसांपूर्वीच पार पडल्या होत्या. यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय सिंह यांची निवड झाली होती. मात्र, संजय सिंहांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Brijbhushan Sharan Singh and Sanjay Singh
DMK MP Dayanidhi Maran Statement : यूपी-बिहारचे लोक आमच्याकडे शौचालये.. : द्रमुक खासदाराचे वादग्रस्त विधान!

तसेच कुस्तीगीर आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने आपले पद्म पुरस्कार परत केले. यामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका झाली. यानंतर अखेर मोदी सरकारला जाग आली आणि मोठा निर्णय घेत थेट नव्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याचा निर्णयच सरकारने घेतला. तसेच संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगितीही देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबरोबरच पुढील आदेश येईपर्यंत सर्व कामांवर बंदी घालण्यात आली असून कुस्ती संघटनेची ही निवडणूक वैध नसल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलं आहे. दरम्यान, ही कारवाई करण्यात आल्यामुळे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह आणि संजय सिंह यांना मोठा धक्का बसला आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Brijbhushan Sharan Singh and Sanjay Singh
BJP News: तीन राज्याच्या विधानसभा जिंकल्यानंतर भाजपचा पुढचा प्लॅन ठरला; नव्या मिशनची घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com