Narhari Zirwal, Chhagan Bhujbal, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

NCP Ministers Meet Pawar: शरद पवारांना पाहताच झिरवळ अन् बनसोडे पाया पडले; तर भुजबळ म्हणाले, 'विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला..'

Ajit Pawar and Leaders Meet Sharad Pawar: अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट

सरकारनामा ब्यूरो

NCP News: राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नवनिर्वाचित सर्व मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. या भेटीत अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहण्यासाठी विनंती केली. मात्र, हे मंत्री ज्यावेळी शरद पवारांच्या भेटीला गेले, त्यावेळी आतमध्ये नेमकं काय घडलं? याची अनेकांना उत्सुकता आहे.

या भेटीत मंत्री संजय बनसोडे आणि नरहरी झिरवळ यांनी शरद पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. तर छगन भुजबळ हे आत जाताच "विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला", असं म्हणत छगन भुजबळ देखील शरद पवारांच्या पाया पडल पडले, अशी माहिती समोर आली आहे.

अजित पवार गटाकडून शरद पवार यांना सोबत येण्याची विनंती करण्यात आली. मात्र, यावर शरद पवारांनी काहीही भाष्य न करता अजित पवारांनाही त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, राष्ट्रवादीत घडलेल्या घडामोडींबाबत या मंत्र्यांनी शरद पवारांकडे दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

या भेटीबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, "शरद पवार आमचे दैवत आहेत. आम्ही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गेलो होतो. आम्ही सर्वांनी मिळून शरद पवारांना विनंती केली की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ कसा राहिल, याचा विचार करावा. त्यांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. मात्र, यावर अद्याप शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही", अशी माहिती प्रफुल्ल पटेलांनी दिली.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT