NCP Ministers Meet Sharad Pawar: अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांना केली 'ही' विनंती

Ajit Pawar and Leaders Meet Sharad Pawar: अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
Ajit Pawar and Leaders Meet Sharad Pawar
Ajit Pawar and Leaders Meet Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP News: राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नवनिर्वाचित सर्व मंत्र्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनच्या एक दिवस आधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने या भेटीत नेमकं काय चर्चा झाली, याकडे अनेकांचे लक्ष लागले.

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ कसा राहिलं, याचा विचार करावा, अशी विनंती देखील केल्याची माहिती या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Ajit Pawar and Leaders Meet Sharad Pawar
Sanjay Shirsat On Ajit Pawar : अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका ; आधी टीका, आता बचाव..

प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?

"शरद पवार आमचे दैवत आहेत. आम्ही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गेलो होतो. शरद पवार हे आज त्यांच्या कामानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे येणार होते, याची कल्पना आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्यांची या ठिकाणी भेट घेतली".

"आम्ही सर्वांनी मिळून शरद पवारांना विनंती केली की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ कसा राहिल, याचा विचार करावा. त्यांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. मात्र, यावर अद्याप शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही", असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com