Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी गुरूवारी पत्रकारांना मारण्याची धमकी दिली आहे. त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना उद्देश बोलताना पाटील यांनी अश्लील शब्दांचा उच्चार करत धमकावले. एवढेच नाही तर हे रेकॉर्ड करून कमिश्नरला दाखवा, असे उघड आव्हानही त्यांनी दिले आहे. या प्रकाराचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत.
संजय दिना पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकत नुकताच शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. त्यानंतर त्यांच्यात आणि खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. पाच जणांना मारल्याचे पाटील यांनी मीडियाशी बोलताना जाहीरपणे सांगितले होते. त्यावर राऊतांनीही त्यांना खुले आव्हान दिले होते.
त्यानंतर आता पाटील यांनी पत्रकारांनाही धमकावले आहे. त्यांनी पत्रकारांना उद्देशून म्हटले की, लिमिट आहे सगळ्या गोष्टीला. आता माझ्याकडे प्रतिक्रेयला येऊ नका नाहीतर मारून पाठवेन. इज्जत देतोय, इज्जतीत राहा. हे रेकॉर्ड करा आणि कमिश्नरला दाखवा, असे पाटील म्हणाले आहेत. त्यांनी यावेळी काही अश्लील शब्दांचाही उच्चार केला. पाटील यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. आता पत्रकारही सुरक्षित नाहीत, असे सांगत त्यांनी सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंती केली. दरम्यान, संजय दिना पाटील यांच्या या संतापजनक भाषेवरून आता त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.
आमदार आदित्य ठाकरेंनी पाटलांवर सडकून टीका करत एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील राऊत यांच्यासह काही नेत्यांनी पाटील यांच्या या विधानांचा खरपूस समाचार घेतला. या घटनेच्या काही तास आधीच संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांची मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून तक्रार केली आहे. त्यांच्यावर UAPA अंतर्गत कारवाई करण्याची मागणी राऊतांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.