Political Viral Video : फोडाफोडीच्या राजकारणात सुखावणारी घटना; पक्षाचे दोन तुकडे, अखेर माजी केंद्रीय मंत्री असलेल्या लेकानं धरले बापाचे पाय, दोघेही ढसाढसा रडले...

Anbumani Ramadoss, S Ramadoss, PMK News : संपूर्ण कुटुंब यावेळी एकत्र आले होते. बापलेकाने एकत्र येत आपले राजकीय वैर संपविल्याची चर्चा तामिळनाडूसह देशभरात होत असून या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
A heart-touching political moment from Tamil Nadu has gone viral after Anbumani Ramadoss met his father and PMK founder S. Ramadoss after a long period of estrangement.
A heart-touching political moment from Tamil Nadu has gone viral after Anbumani Ramadoss met his father and PMK founder S. Ramadoss after a long period of estrangement.Sarkarnama
Published on
Updated on

Father Son Reunion Politics : मागील काही वर्षांत पक्षफुटीच्या प्रकरणांनी देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रात शिवसेना पक्षफुटीचे प्रकरण सर्वाधिक चर्चेत राहिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस पक्षाचे तुकडे झाले. आणखी काही पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सातत्याने होत असतानाच एक सुखावणारी घटना घडली आहे.

दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील राजकारणातील एक भावूक क्षण समोर आला आहे. पक्षीय राजकारणामुळे दीड वर्षांपूर्वी बाप-लेकाची ताटातूट झाली होती. अखेर बुधवारी दोघांचीही मनं जुळून आली. माजी केंद्रीय मंत्री अंबुमणी हे जवळपास दीड वर्षांनंतर वडील रामदास यांना भेटले. त्यांच्या पायावर डोकं टेकवलं अन् कडकडून गळाभेटही घेतली. बापलेकातील राजकीय वैर यावेळी संपुष्टात आले.

नेमकं काय घडलं?

डॉ. एस. रामदास यांनी १९८९ मध्ये पट्टाली मक्कल काची (PMK) या पक्षाची स्थापना केली होती. आतापर्यंतच्या राजकारणात या पक्षाने नेहमीच विजयी होणाऱ्या पक्षासोबत आघाडी करत सत्तेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. रामदास यांनी पुत्र अंबुमणी यांना २०२२ मध्ये पक्षाचे अध्यक्ष केले. अंबुमणी हे युपीए सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये केंद्रात आरोग्यमंत्री होते.

A heart-touching political moment from Tamil Nadu has gone viral after Anbumani Ramadoss met his father and PMK founder S. Ramadoss after a long period of estrangement.
BJP Councillors Oath : हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; भाजपच्या 20 नगरसेवकांची शपथ ठरविली अवैध, देशभरातील 'पॅटर्न' बदलणार?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी एनडीएमध्ये जागावाटपावरून बाप-लेकामध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यावरून रामसदार यांनी अंबुमणी यांना थेट पक्षातून काढून टाकले आणि स्वत:ला आजीवन अध्यक्ष घोषित केले. मात्र अंबुमणी यांनी आपणच अध्यक्ष असल्याचे सांगत वडिलांचे निर्णय अमान्य केले आणि पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीत अंबुमणी यांच्या उमेदवारांविरोधात रामदास यांनीही उमेदवार उभे केले होते. मागील दीड वर्षे बाप-लेकामध्ये राजकारणामुळे कौटुंबिक दुरावाही निर्माण झाला होता.

A heart-touching political moment from Tamil Nadu has gone viral after Anbumani Ramadoss met his father and PMK founder S. Ramadoss after a long period of estrangement.
Omraje Nimbalkar news : मशालीवर मत मिळेना म्हणणारे खासदार ओमराजे तोंडघशी; ZP, नगरपालिका, पंचायत समितीत ठाकरेंचे शिलेदार लढवतायेत किल्ला... हा घ्या पुरावा....

मनं जुळून आली

अखेर बुधवारी अंबुमणी यांनी आई-वडिलांच्या लग्नाच्या ६१ व्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्यांचे घर गाठले. घरात प्रवेश करताच अंबुमणी यांनी वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारत. यावेळी या दोघांसह कुटुंबातील अन्य सदस्यांच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू वाहत होते. संपूर्ण कुटुंब यावेळी एकत्र आले होते. बापलेकाने एकत्र येत आपले राजकीय वैर संपविल्याची चर्चा तामिळनाडूसह देशभरात होत असून या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com