Sanjay Dutt Sarkarnama
मुंबई

Sanjay Dutt News : लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर संजय दत्तने स्पष्ट केली भूमिका, म्हटले...

Loksabha Election 2024 : यंदा लोकसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींना राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली गेली आहे.

Mayur Ratnaparkhe

Sanjay Dutt and Politics : अभिनेता संजय दत्तने आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर खुलासा केला आहे. सोशल मीडियावर पोस्टद्वारे संजय दत्तने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील अनेक दिवसांपासून संजय दत्त लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. यावरून उलटसुलट प्रतिक्रियाही उमटत होत्या. अखेर आता संजय दत्तने स्वत: याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांकडून अभिनेता, अभिनेत्री, खेळाडूंसह सेलिब्रिटींना उमेदवारी दिली गेली आहे. याच पार्श्वभूमीर संजय दत्तच्या नावाचीसुद्धा चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय दत्त राजकारणात पदार्पण करू शकतो, असं म्हटलं जात होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एवढच नाही तर देशातील प्रमुख विरोधी पक्ष असणारा काँग्रेस(Congress) संजय दत्तला हरियाणातील करनाल मतदारसंघामधून उमेदवारी देऊ शकतो, असं सांगितलं जात होतं. या मतदारसंघामधून हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर संजय दत्तने म्हटले आहे की, मी राजकारणात पदार्पण करतोय, ही केवळ अफवा आहे. मी या अफवांना पूर्णविराम देत आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही आणि निवडणूकही लढवणार नाही. भविष्यात जर मी राजकारणात पाऊल ठेण्याचा निर्णय़ घेतलाच,तर मी याबाबत स्वत: सर्वात आधी घोषणा करेन. परंतु सध्या माझ्या राजकारणातील प्रवेशाबाबत ज्या काही चर्चा सुरू आहेत आणि बातम्या पसवरल्या जात आहेत, त्या खऱ्या नाहीत.

विशेष म्हणजे या अगोदर 2019 मध्येही संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. तेव्हा तो महादेव जानकर(Mahadev Jankar) यांच्या रासपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, तर 2009-2010 वर्षांत संजय दत्तने मुलायम सिंह यांच्या समाजवादी पार्टीचं सरचिटणीस पदही भूषवलेलं आहे. यामुळेच आता तो पुन्हा राजकारणत पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT