Ramdas Kadam sarkarnama
मुंबई

प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना रामदास कदमांनी जेवणावळी दिल्या...

रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर शिवसेनेच्या माजी आमदाराचे गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

खेड : दापोली तालुक्यातील मुरुड येथील जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी (Ramdas Kadam) दापोलीचे त्यांच्याजवळचे कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्या करवी पुरवल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम यांनी आज केला.

त्यांच्या या आरोपाने रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर (Vaibahv Khedekar) व माजी आमदार संजय कदम (Sanjy Kadam) यांचीही संयुक्त पत्रकार परिषद आज घेतली. इतकेच नाही तर त्यांनी पुराव्यासाठी मोबाईल वरील संभाषणाच्या दहा ऑडिओ क्लीपच पत्रकार परिषदेत सादर केल्या.

आमच्या महाविकास आघाडीत काही सूर्याजी पिसाळ तयार झालेत असाही खळबळजनक आरोप यावेळी केला. पालकमंत्री अनिल परब यांनी उद्धव ठाकरे साहेबांना सांगून मला मंत्रीमंडळात घेण्यापासून ऱोखले आहे, असे फोनवरील प्रसाद कर्वे यांच्यातील संभाषण प्रसार माध्यमांना यावेळी ऐकवण्यात आले.

आमची भूमिका ही कोकणातील पर्यटन व्यवसायाच्या बाजूने आहे. रामदास कदम व पालकमंत्री अनिल परब,मिलिंद नार्वेकर यांच्यात वाद असतील तर त्या वादाचा त्रास जर आमच्या पर्यटन व्यवसायिकांना होत असेल तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांच्या एका तक्रारीमुळे येथील ऐंशी हाॅटेल व्यावसायिकांना कलेक्टरांच्या नोटीस प्राप्त झाल्या आहेत.त्यामुळे येथील व्यावसायिक मोठ्या चिंतेत पडला असून त्याला उभारी कोण देणार त्यांच्या मनातील भीती कशी घालवायची हा प्रश्न आता निर्माण झाला आहे असे संजय कदम म्हणाले. कोकणातील हा पर्यटन व्यवसाय बंद पडत असेल तर ही कोकणातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असा इशाराही यावेळी संजय कदम यांनी दिला.

जो प्रसाद कर्वे माहीतीचा अधिकार वारपरून बाकीच्या गोष्टी करत असेल व रामदास कदम त्याचा उपयोग यासाठी करत असतील तर तो कर्वे त्यांनाही भविष्यात भारी पडेल,ज्यांनी मोबाईल वर कॉल रेकॉर्ड ठेऊन रामदास कदम यांना कॉल केला याचा अर्थ स्पष्ट आहे, असे कदम यांनी सांगितले. आम्ही या सगळ्याचे पुरावे आमच्या नेत्यांकडे दिले आहेत अशीही माहिती माजी आमदार संजय कदम यांनी दिली.

किरीट सोमय्या यांची जर पुन्हा वक्रदृष्टी कोकणावर विशेषतः मुरूड,हर्णे बीचवर पडली तर आम्ही त्यांना रोखू असा इशारा मनसेचे कोकण विभागीय संघटक नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिला यावेळी दिला. रामदास कदम यांनी खेडचे विमान पळवले होते. तसेच माझ्या नगराध्यक्ष केबीनचा विषय जाणूनबुजून चिघळवला होता. विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना जेवणावळी दिल्या जातात या वरून माजी मंत्री शिवसेनेच्याच मंत्र्यांच्या विरोधात कसे काम करत आहेत हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

असे जरी असले तरी महाविकास आघाडीचे सरकारला कांहीही होणार नाही. रामदास कदम हे सरकार अस्थिर करण्याचे प्रय़त्न करत आहेत. असे ते म्हणाले. आम्ही पुरावा म्हणून दिलेल्या आॅडिओ क्लीप मुळे रामदास कदम यांचा खरा चेहरा काय आहे, तो समोर आला आहे. अनिल परब अडचणीत कसे येतील यासाठी त्यांनी केलेले हे प्रयत्न फारच भयंकर आहेत. या प्रकरणात त्यांनी स्वतःचा भाऊ सादनंद कदम यांचे नाव कसे अडकवता येईल याचाही त्यांनी पुरेपुर प्रयत्न केल्याचे दिसते असे ते म्हणाले.

अनिल परब यांचे बांद्रा येथील कार्यालय कसे तुटेल यासाठी त्यांनी केलेला आटापीटा या आॅडिओ क्लीप मधे एेकायला मिळतो. प्रसाद कर्वे यांच्या मदतीने रामदास कदम यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवायची आणि त्रास द्यायचा असे काम त्यांनी आतापर्यंत केले आहे. प्रसाद कर्वे हा संधीसाधू असल्याचे माजी आमदार संजय कदम म्हणाले. कर्वे यांनी आतापर्यंत एकही सामाजिक काम केल्याचे दाखवावे, असे ते म्हणाले.

किरीट सोमय्या यांचे थोबाड न बघणारे रामदास कदम हे मात्र कर्वे यांच्या बरोबर सोमय्या यांच्याबाबत बोलताना दिसते. तसेच स्वतः प्रसाद कर्वे आणि किरीट सोमय्या यांच्यात झालेले मुरूड रिसाॅर्ट बद्दलचे संभाषणाची आॅडिओ क्लीपही आज यावेळी ऐकवण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT