परब यांच्या खुर्चीखाली रामदास कदम यांनीच बाॅंम्बगोळा ठेवला... Audio clip व्हायरल

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मात्र हा आरोप फेटाळला..
परब यांच्या खुर्चीखाली रामदास कदम यांनीच बाॅंम्बगोळा ठेवला... Audio clip व्हायरल

मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वादाला मोठी फोडणी मिळाली असून आपल्याच पक्षातील नेत्यांविरोधात कटकारस्थान रचल्याचा वाद पुढे आला आहे. हा वाद माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) आणि विद्यमान मंत्री अनिल परब (Anil Parab) या दोन नेत्यांतील. कदम यांचे कार्यक्षेत्र असलेल्या रत्नागिरीचे पालकमंत्रीपद परब यांच्याकडे आहे. त्यामुळे रत्नागिरीतच हे शिजल्याचे पुढे आले आहे. या वादावर आता पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय तोडगा काढणार, याविषयी उत्सुकता आहे.

परब यांच्या खुर्चीखाली रामदास कदम यांनीच बाॅंम्बगोळा ठेवला... Audio clip व्हायरल
राष्ट्रवादीचा नेता पळविण्यासाठी रामदास कदम खास मुंबईहून आले...

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. त्यांचे रत्नागिरीतील रिसाॅर्ट असो की मुंबईतील म्हाडा इमारतीतील बांधकाम असो, यावर सोमय्या यांनी तक्रारी करत परब यांना घेरले आहे. परब यांच्याविरोधात ईडीची देखील कारवाई सुरू आहे. त्यांची ईडीने सुमारे आठ तास चौकशी केली.

या साऱ्या वादात कदम यांची भूमिका काय याचा उलगडा आॅडिओ क्लिपमधून पुढे आला आहे. या क्लिपच्या दाव्याच्या आधारे परब यांच्याविरोधातील माहिती कदम यांनीच पुरविल्याचा दावा करण्यता आला आहे. अर्थात हा दावा मनसेने केला आहे.अनिल परब यांच्याविरोधातील सारी माहिती रामदास कदम यांनी दिल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम आणि मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केला आहे.

परब यांच्या खुर्चीखाली रामदास कदम यांनीच बाॅंम्बगोळा ठेवला... Audio clip व्हायरल
मोठी बातमी : अनिल परब यांच्यावरील कारवाई तूर्त टळली

त्यांनी पुढे आणलेल्या एक ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांचा आवाज असल्याचा मनसेचा आरोप आहे. तसेच दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये प्रसाद कर्वे हे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याशी संवाद साधत असल्याचे सांगितले जात आहे.

'अनिल परब यांच्या वांद्रे येथील कार्यालयावर काय कारवाई झाली, अशी विचारणा एक व्यक्ती करताना दिसतो. त्यावर सोमय्या म्हणतात, 'निकाल लागला आहे. त्याची ऑर्डर झाली. आपण केस जिंकलो. म्हाडाने एका महिन्यात कार्यालय पाडण्याचं मान्य केलं', असे सोमय्या सांगत असल्याचे ऐकू येते. सोमय्या यांच्याशी कर्वे यांचा संवाद असल्याचे सांगण्यात येत आहे.

परब यांच्या खुर्चीखाली रामदास कदम यांनीच बाॅंम्बगोळा ठेवला... Audio clip व्हायरल
अनिल परबांनी सोमय्यांना दिलेला इशारा खरा करून दाखवला!

दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये 'अनिल परब यांचं कार्यालय तोडण्याची तयारी झाली', असं एक व्यक्ती बोलतो. त्यानंतर जो आवाज रामदास कदम यांचा असल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर 'चांगलं झालं. आता अनिल परब यांना राजीनामा द्यावा लागेल,' अशी प्रतिक्रिया कदम यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच 'किरीट सोमय्या आले का. त्याला घेऊन तू किती वाजता येणार आहे. तिथून निघताना मला फोन कर, असेही कदम यांनी म्हटल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र रामदास कदम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत या क्लिपमधील आवाज आपला नसल्याचे खुलासा केला आहे. दुसरीकडे संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप करत आपले मंत्रीपद गेल्याने ते अस्वस्थ झाल्याने ते आपल्याच पक्षाच्या विरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप केला. कदम यांच्या अशा अनेक क्लिप क्लिप या उद्धव ठाकरे यांच्यापर्य़ंत पोहोचल्याचा दावा संजय कदम यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे यावर काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com