Sanjay Nirupam Sarkarnama
मुंबई

Sanjay Nirupam News : काँग्रेसमध्ये आहेत पाच सत्ताकेंद्र; निरुपम यांनी थेट नावं सांगितली...

Rajanand More

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अनेक धक्के बसत आहेत. प्रामुख्याने मुंबईत काँग्रेसची स्थिती खिळखिळी होत असल्याचे चित्र आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी हे पक्षातून बाहेर पडल्यानंतर संजय निरुपम (Sanjay Nirupam News) यांना काल पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आज निरुपम यांनी पक्षाची धोरणे आणि नेत्यांवर सडकून टीका केली. काँग्रेसमध्ये पाच सत्ताकेंद्र असल्याचा दावा करत त्यांनी गांधी कुटुंबावरही हल्ला चढवला.

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ शिवसेनेच्या (Shiv Sena) वाट्याला गेल्याने निरुपम यांनी आगपाखड केली होती. त्यानंतर काल त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. निरुपम यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे आज स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्या अडचणी वाढणार आहेत. (Latest Marathi News)

आज मीडियाशी बोलताना निरुपम यांनी काँग्रेसमधील (Congress) नेत्यांवर जोरदार टीका केली. काँग्रेसमध्ये पाच सत्ताकेंद्र असल्याचे सांगत ते म्हणाले, प्रत्येकाची स्वतंत्र लॉबी असून, त्यांच्यात वाद होत असतात. यामध्ये लाखाे कार्यकर्ते अडकले आहेत. पाच सत्ताकेंद्रांपैकी पहिले केंद्र सोनिया गांधी त्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi News), तिसरे प्रियांका गांधी आणि चौथे सत्ताकेंद्र पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे आहे, तर पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे पाचवे सत्ताकेंद्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाचही जणांभोवती असलेल्या लोकांची कोणतीही राजकीय विचारधारा नाही. खर्गे यांना आपलेसे करून ते मोठे झाले. ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे ते मागे पडले आहेत. अनेक वर्षांपासून हे मी पाहत आहे. पण आता संयम संपला, असे निरुपम म्हणाले. तसेच काल रात्री 10.40 वाजताच मी माझा राजीनामा खर्गे यांना पाठवला आहे. त्यामुळे त्यांनी कागद वाया घालवला, असा टोलाही निरुपम यांनी निलंबनाच्या आदेशावरून लगावला.

काँग्रेस पूर्णपणे विस्कळीत पक्ष आहे. पक्षाची विचारधारा दिशाहीन असल्याचे नेते म्हणत होते. पण आता पक्षाची संघटनाच विस्कळीत झाली आहे. पूर्वी पक्षात केवळ एकच सत्ताकेंद्र होते, असे निरुपम म्हणाले. दरम्यान, उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवण्यावर ते ठाम असल्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT