uddhav thackeray sarkarnama
मुंबई

Assembly North East Mumbai : ठाकरेंच्या खासदाराचे टेन्शन वाढले, निवडणुकीतील 'ती' चूक भोवणार?

Roshan More

Sanjay Patil News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले. मुंबईत उद्धव ठाकरेंचे सर्वाधिक खासदार विजयी झाले. मात्र, उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातून विजयी झालेले ठाकरेंचे शिलेदार संजय दिना पाटील यांच्या अडचण वाढण्याची शक्यता आहे.

संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आईचे नाव टाकले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

संजय पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या पराभूत टॅक्सी ड्रायव्हरने मुंबई उच्च न्यायलायत पाटील यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालयाने उत्तर-पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या सर्वच उमेदवारांना समन्स बजावले आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 ऑक्टोबरला होणार आहे. त्यावेळी संजय पाटील हे आपली बाजू वकिलांच्या मार्फत मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांचा संजय पाटील यांनी पराभव केले होते. निवडणुकीच्या आधी संजय पाटील आणि मिहीर कोटेचा यांचे समर्थ भिडले होते. संजय पाटील यांच्या समर्थकांनी कोटेचा यांच्या कार्यालयाची देखील तोडफोड केली होती.

मिहीर कोटेचा यांचा पराभव

लोकसभा निवडणुकीत संजय दिना पाटील यांनी भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांचा 29 हजार 800 मतदांनी पराभव केला होता. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिहीर कोटेचा यांनी भाजप उमेदवार किरीट सोमय्या यांना पराभूत केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT