One Nation One Election : 'आधी तुमच्या अध्यक्षाची निवडणूक घ्या मग 'वन इलेक्शन'वर बोला', मोठ्या नेत्याने भाजपला सुनावले

BJP Criticized Over One Nation One Election Plan: अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्याने 'वन इलेक्शन'चे समर्थन केले होते. मात्र, अखिलेश यादव यांनी स्वतः ट्विटकरत 'वन इलेक्शन'ला विरोध असल्याचे स्पष्ट करत भाजपवर टीका केली.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Akhilesh Yadav News: मोदींच्या मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.18) 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या प्रस्तावाला मंजुरी दिली. तब्बल 32 राजकीय पक्ष या प्रस्तावाच्या बाजुने आहेत तर 15 पक्षांनी याला विरोध दर्शवला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी 'वन नेशन, वन इलेक्शन'वरून भाजपला सुनावले आहे.

'वन नेशन, वन इलेक्शन'च्या बाता नंतर मारा आधी भाजपमधील अध्यक्षपदाची तसेच भाजप अंतर्गत जिल्हा, शहर, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडणुका एकाच वेळी घ्या नंतर संपूर्ण देशाबद्दल बोला, असा टोला अखिलेश यांनी भाजपला लगावला आहे.

अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्याने 'वन इलेक्शन'चे समर्थन केले होते. मात्र, अखिलेश यादव यांनी स्वतः ट्विटकरत 'वन इलेक्शन'ला विरोध असल्याचे स्पष्ट करत भाजपवर टीका केली

'तुमच्या पक्षात तर 'एकच व्यक्ती, एक मत' अशीच चर्चा सुरू असताना आजपर्यंत तुमच्याच राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक का होत नाही. कमकुवत झालेल्या भाजपमध्ये ‘दोन व्यक्ती, दोन मत’ची लढाई तर नाही ना.', असे आपल्या ट्विटमध्ये म्हणत अखिलेश यांनी भाजपमध्येच अंतर्गत वाद असल्याचा दावा देखील केला आहे.

Narendra Modi
One Nation One Election : 'वन नेशन वन इलेक्शन'ला कोणाचे समर्थन कोणाचा विरोध?

'वन नेशन वन इलेक्शन' पेक्षा महाराष्ट्र, झारखंड आणि यूपीच्या पोटनिवडणुकाही तातडीने जाहीर झाल्या असत्या तर बरे झाले असते. 'वन नेशन, वन इलेक्शन' हे तत्त्व असेल तर सरपंचापासून पंतप्रधानपर्यंत सर्वच निवडणुका एकाच वेळी होतील का? कोणत्याही राज्यात भाजपने निवडून दिलेले सरकार पाडले की पुन्हा संपूर्ण देशाच्या निवडणुका होतील का? असा सवाल देखील अखिलेश यादव यांनी विचारला आहे.

निवडणुकांच्या खासगीकरणचा डाव

अखिलेश यादव यांनी 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या माध्यमातून निवडणुकांचे खासगीकरण करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे. उद्या सरकार म्हणेल की एकाच वेळी संपूर्ण देशात निवडणुका घेण्यासाठी सरकारकडे पुरेस मनुष्यबळ नाही. मग निवडणूक घेण्यासाठी खासगी कंत्राट काढले जाईल. असा आरोपही अखिलेश यांनी केला आहे.

Narendra Modi
Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat : सुजय विखे थांबायला तयार नाय; थोरातांच्या घरासमोर जात..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com