Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : 'ईव्हीएम'चा जनादेश म्हणत संजय राऊतांचे भाजपला दोन चॅलेंज; म्हणाले, 'मोदी लाट असेल तर...'

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे म्हटले जाते. हा ईव्हीएमचा जनादेश असला तरी लोकशाहीत तो मान्य केला आहे. असे म्हणत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी भाजपला दोन मोठे चॅलेंज दिले आहेत. तसेच महाराष्ट्रात कुणाचा करिष्मा चालत नाही तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची जादू आहे, असा इशाराही राऊतांनी दिला.

निकालाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊतांनी भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा असल्याचे मान्य केले. २०१८ मध्ये मोदी लाट आली म्हणत भाजपने शिवसेनेशी असलेली युती तोडली. आता पुन्हा मोदी लाट आली असेल तर राज्यात भाजपसोबत गेलेल्या शिवसेना आणि राष्ट्रावादीच्या अजित पवार गटाला धोक्याची घंटा आहे. आता त्यांचे काय होणार, याचीच चिंता आहे, असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला.

राऊतांचे भाजपला आव्हान

आता मोदी लाटेमुळे देशातील मोठ्या राज्यात भाजपचे सरकार आले आहे. तीन राज्ये जिंकल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला असेल. त्यामुळे सरकारने आता मुंबई, ठाण्यांसह राज्यातील एकूण १४ महानगरपालिकेच्या निवडणुका घ्याव्यात. चार राज्यांच्या निवडणुका वेगळ्या तर महाराष्ट्राच्या निवडणुका वेगळ्या आहेत. येथे कुणाचाही करिष्मा चालणार नाही, असेही राऊत म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्य प्रदेशातील निकाल धक्कादायक आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीत दिग्विजय सिंह मुंबईत होते. त्यावेळी त्यांनी ईव्हीएमबाबत चर्चा करण्याचाी मागणी केली होती. त्यांना असलेल्या संशयाबाबत प्रझेंटेशन दिले होते. आता झाले ते झाले. मात्र, लोकांच्या मनात लोकशाहीबाबत शंका असेल तर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे. मी ईव्हीएमला दोष देत नाही, पण फक्त एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे आव्हानही राऊतांनी दिले आहे.

देशात गेल्या दहा वर्षांपासून अपशब्दांचा सर्रासपणे वापर होत असल्याचा आरोप राऊतांनी केला. ते म्हणाले, राहुल गांधींनी मोदींवर टीका करताना पनवती शब्दाचा वापर केल्याचा काँग्रेसला फटका बसला नाही. गेल्या दहा वर्षांत अशा शब्दाचा अनेकदा वापर झालेला आहे. मोदी-शाहांनी वारंवार असे शब्द वापरले आहेत. त्यांना कुठे फटका बसला, असा प्रश्न उपस्थित करत हा ईव्हीएमचा जनादेश असल्याचा दावा राऊतांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT