Pune News : भाजप कडून बहुतेक मोठ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्यात आले होते. जेणेकरून ते राज्यांमध्ये पक्ष मजबूत करू शकतील. अशा स्थितीत या खासदारांना लोकसभा सोडून राज्यातच सक्रिय होण्यास सांगितले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात आमदार म्हणून निवडून आलेल्या मंत्री आणि खासदारांना येत्या14 दिवसांत विधानसभा किंवा संसदेचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद पटेल यांनीही मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. याशिवाय छत्तीसगडमधूनही रेणुका सिंह विजयी झाल्या आहेत. आता या मंत्र्यांच्या भवितव्याबाबतही चर्चा सुरू आहे.
याशिवाय खासदारांबद्दल बोलायचे झाले तर राकेश सिंह, रीती पाठक, राज्यवर्धन सिंह राठौर, दिया कुमारी, अरुण साओ हेदेखील खासदार निवडून आले आहेत. यातील काही लोकांना सरकारमध्ये स्थान मिळू शकते. या लोकांमध्ये विशेषत: होशंगाबादचे खासदार उदय प्रताप सिंह, राजस्थानचे किरोरी लाल मीणा आणि अलवरचे खासदार बाबा बालकनाथ यांचा समावेश आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांची चर्चा सुरू आहे. या तीन राज्यांच्या निकालानंतर केव्हाही बदल होऊ शकतात, असे मानले जात आहे. मात्र, राजीनामा देणाऱ्या खासदारांच्या जागेवर पोटनिवडणूक होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
याचे कारण असे की पोटनिवडणुका 6 महिन्यांच्या आत घ्यायच्या आहेत आणि 2024 च्या निवडणुकीसाठी कमी वेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत निवडणुका होऊ शकत नाहीत, अशी शक्यता आहे.
हिंदी पट्ट्यातील तीन राज्यात सत्ता मिळवलेल्या भाजपने आता केंद्र सरकारमध्ये फेरबदलाची तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच काही बदल दिसू शकतात. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून येणाऱ्या काही खासदारांनची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे.
यामुळे 2024 साठी स्थानिक पातळीवर समीकरण बळकट होण्यास मदत होईल, असे पक्षाला वाटते. याशिवाय राज्यांमध्ये आमदार म्हणून निवडून आलेल्या काही खासदारांकडूनही राजीनामे घेतले जाऊ शकतात आणि त्यांना संबंधित राज्यांमध्ये काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.