Sanjay Raut | Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On Raj Thackeray : "हिंमत असेल, तर...", संजय राऊतांनी दिलं राज ठाकरेंना चॅलेंज

Akshay Sabale

Maharashtra Politics : बीडमधील घटनेशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही, हे सांगितलं आहे. तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला आणि शिवसेनेला आव्हानं कसली देत आहात? आम्हाला महाराष्ट्रातील मराठी माणसांत भांडणं लावायची नाहीत.

कुणी लावत असेल, तर ते आम्हाला मान्य नाही. हिंमत असेल, तर आम्हाला धमक्या देण्याऐवजी अहमद शहा अब्दालीला धमक्या द्या, असं चॅलेंज शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं आहे. ते मुंबई प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

"उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या ताफ्यावर काळोख्यातून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही सुपारीबाजांची लोक आहेत. त्यातील कुणीही ठाण्यातील नव्हतं. सत्ता आहे, म्हणून तुम्ही असं वागत आहात. पण, दोन महिन्यानंतर सत्ता आमच्या हातात येणार आहे. तेव्हा तुम्ही कुठे आणि कुठल्या बिळात लपता? ते आम्ही पाहू," असा संताप राऊत यांनी शिंदे सरकारवर व्यक्त केला.

"अहमद शहा अब्दाली महाराष्ट्रातील मराठी माणसांत भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. याला सुपारीबाज बळी पडत आहेत. आम्हाला महाराष्ट्रातील मराठी माणसांत भांडणं लावायची नाहीत. कुणी लावत असेल, तर आम्हाला ते मान्य नाही," असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

"महाराष्ट्रात एकसंघ राहिला पाहिजे. बघून घेऊन वगैरे, अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. पण, अहमद शहा अब्दालीला धमक्या द्या. जो महाराष्ट्र लुटतोय, मराठी अस्मिता पायाखाली तुडवत आहे, त्यांना आव्हान द्या... आम्हाला कसे आव्हान देत आहात.. आम्ही समर्थ आहोत.. हिंमत असेल, तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शहा अब्दाली आणि त्यांच्या सुपारी गँगला आव्हान देण्याची भाषा करा. मात्र, आम्ही बघू घेऊ, घोडा मैदान लांबू नाही," असं संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना ठणकावलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT