Narendra Modi Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Pahalgam attack : "देश संकटात, चिंता नाही, मनोरंजन सृष्टीतील लोकांसोबत 9 तास रमतात, टाळ्या वाजवतात..."; ठाकरे गटाचा PM मोदींवर हल्लाबोल

Sanjay Raut criticizes Narendra Modi : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशावर संकट आलं असतानाही ते मुंबई बिहारमध्ये फिरत आहेत. त्यांच्या चेहऱ्यांवर कसलीही चिंता नाही, असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

Jagdish Patil

Sanjay Raut on Pahalgam Attack : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशावर संकट आलं असतानाही ते मुंबई बिहारमध्ये फिरत आहेत. त्यांच्या चेहऱ्यांवर कसलीही चिंता नाही, असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला मोकळीक दिली आहे. लष्कराला जे काही करायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, मोदींची ही भूमिका म्हणजे, तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, अशा प्रकारची असल्याचं राऊत म्हणाले.

कारण मोदींनी ठोस न निर्णय न घेता केवळ सूट दिली आहे. त्यामुळे युद्ध जिंकलं तर श्रेय घेण्यासाठी हे पुढे येतील आणि काही चूकीचं घडलं तर त्याचं खापर ते लष्करावर फोडतील, असं म्हणत पंतप्रधानांमध्ये राजकीय नेतृत्व गुण नसून जे काही होईल त्याची जबाबादारी घेण्याची कुवत नाही.

त्यामुळे त्यांचं नेतृत्व पोकळ असल्याची टीका राऊत यांनी केली. दरम्यान, देशावर इतकं मोठं संकट आलं असताना मोदी प्रचारासाठी फिरत आहेत. त्यांच्या चेहऱ्यांवर कसलीही चिंता नाही, असं म्हणत त्यांनी मोदींच्या बिहार आणि मुंबई दौऱ्यावर टीका केली.

ते म्हणाले, "पहलगाम येथील हल्ल्यात देशातील लोक मारले गेले आणि पंतप्रधान मोदी हे बिहार दौऱ्यावर प्रचारासाठी जात आहेत. ते काल मुंबईत आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नाही. ते मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्यांसोबत,अभिनेत्रींसोबत 9 तास रमले, टाळ्या वाजवत होते.

देशावर हल्ला झाला असताना ते हे कार्यक्रम रद्द करू शकले असते, पण त्यांनी तसे केलं नाही." तसंच यावेळी त्यांनी देशातील पुलवामा असो वा पहलाम येथील दहशतवादी हल्ला हा गृहमंत्री अमित शाह याचं अपयश असून त्यांनी सर्वात आधी राजीनामा द्यायला पाहिजे, असं म्हणत शहांवर देखील हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT