Shiv Sena UBT MP Sanjay Raut writes a heartfelt note from his hospital bed with a saline drip in hand, touching hearts on social media. Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut update : सलाईन लावलेल्या हातात पेन, पानभर मजकूर..! रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संजय राऊतांची भावनिक पोस्ट

Sanjay Raut’s Emotional Hospital Post Goes Viral : सोशल मीडियातील या पोस्टनंतर राऊतांना पाच दिवसांनी बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरूवारी त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे.

Rajanand More

Sanjay Raut treatment update : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी आपल्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याची माहिती ३१ ऑक्टोबरला सोशल मीडियातूनच दिली होती. आता रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केला आहे. 

संजय राऊत यांनी सोशल मीडियातून आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत. मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे, मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, असे राऊतांनी पोस्टमध्ये म्हटले होते.

सोशल मीडियातील या पोस्टनंतर राऊतांना पाच दिवसांनी बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरूवारी त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या हाताला सलाईन लावल्याचे दिसत आहे. तसेच हातात पेन असून हाताखाली मजकूर लिहिलेला कागदही आहे.

राऊतांनी म्हटले आहे की, ‘हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र... हा आमच्या पिढीचा मंत्र होता!’ त्यांनी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी लेख लिहिल्याचे दिसत आहे. न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाचे जोहरान ममदानी निवडून आले आहेत. याच विषयावर त्यांनी लेखन केल्याचे मजकुरावरून दिसत आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद घडवून आणण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याची चर्चा होती. मुंबई महापालिकेसाठी दोन्ही बंधू एकत्र येणार, हे जवळपास निश्चित आहे. या राजकीय घडामोडी घडत असतानाच राऊत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT