Rahul Gandhi : राहुल गांधींनी टाकलेल्या 'बॉम्ब'चा धमाका; त्या 'ब्राझिलियन मॉडेल'नं सगळं सांगितलं...

Brazilian Model reacts on Rahul Gandhi claims : राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि निवडणूक आयोगावर थेट आरोप करत हरियाणात मोठ्या प्रमाणावर मतदानातील गैरप्रकार झाल्याचा दावा केला आहे.
Brazilian Model reacts
Brazilian Model reactsSarkarnama
Published on
Updated on

What did the Brazilian model say about Rahul Gandhi: हरियाणा विधानसभा निवडणुकीत ब्राझीलच्या मॉडेलने 22 वेळा मतदान केल्याचा दावा काल झालेल्या (5 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी केला होता. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि निवडणूक आयोगावर थेट आरोप करत हरियाणात मोठ्या प्रमाणावर मतदानातील गैरप्रकार झाल्याचा दावा केला आहे.

पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, हरियाणा विधानसभा निवडणुकीत तब्बल 25 लाख बनावट मते टाकली गेली, तर 5.21 लाख डुप्लिकेट मतदारांची नोंदणी झाली आहे. अनेक ठिकाणी एका व्यक्तीचा फोटो वेगवेगळ्या नावाने वापरण्यात आले आहेत.

Brazilian Model reacts
Rahul Gandhi PC : राहुल गांधींचा 'H' बाॅम्ब, पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे 8 मुद्दे

राहुल गांधी म्हणाले, "आमच्या टीमला या गैरव्यवहाराचे ठोस पुरावे मिळाले आहेत. हे पूर्णपणे सुनियोजित मतदाराची हेराफेरी आहे. त्यामुळे काँग्रेसचा विजय पराभवात बदलला. हरियाणात प्रत्येक आठव्या मतदारामागे एक मतदार बनावट आहे. राज्यात एकूण 2 कोटी मतदार असून त्यापैकी सुमारे 25 लाख मतदार खोटे आहेत.

भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या या मॉडेलचे नाव लरिसा आहे. तिचे नाव कधी ‘स्वीटी’ तर कधी वेगळे दाखवले गेले, असा दावा राहुल गांधींनी केला होता. दरम्यान, लरिसाने आता यावर प्रतिक्रिया दिली असून तिने मतदान केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. तिने म्हटले आहे की ती कधीच भारतात आली नाही आणि तिचे नाव राजकारणात ओढले जाणे तिला आश्चर्यकारक वाटते.

या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी एक वेगळे उदाहरण देत सांगितले की, एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो हरियाणाच्या मतदार यादीत 22 वेळा वेगवेगळ्या नावांनी वापरला गेला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ब्राझिलियन मॉडेल लारिसा हिने आश्चर्य व्यक्त केले आहे.

लारिसाने 'एक्स'वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ती पोर्तुगीज भाषेत बोलताना म्हणाली, “हॅलो इंडिया, मला भारतीय पत्रकारांसाठी एक व्हिडिओ तयार करण्यास सांगण्यात आले. म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आहे. भारतीय राजकारणाशी माझा काडीचाही संबंध नाही. मी कधी भारतात आली नाही. मी ब्राझिलची मॉडेल आहे आणि डिजिटल इन्फूलएन्शनर आहे. मला भारतीय लोकांविषयी आदर आणि प्रेम आहे. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. नमस्ते.' अशी प्रतिक्रिया तिने दिली.

Brazilian Model reacts
Pension Scheme 2025 : महत्त्वाची अपडेट! जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू होणार की नाही? केंद्र सरकारनं केलं पक्कं

लारिसाने सांगितले की एका भारतीय पत्रकाराने तिच्याशी संपर्क साधून या प्रकरणाबाबत विचारणा केली. त्यानंतर तिला फोटो दाखवण्यात आला आणि तिला हे ऐकून धक्का बसला. तिने या व्हिडिओत स्वतः हसत प्रतिक्रिया दिली आणि ही घटना किती हास्यास्पद आहे हे सांगितले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एआयच्या विश्लेषणानुसार, लारिसाचा सूर हा आश्चर्य आणि विनोदी दोन्ही होता. राहुल गांधींच्या या आरोपांमुळे हरियाणाच्या निवडणुकीतील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com