Sanjay Raut Sandeep Raut Vidhita Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ? खिचडी घोटाळ्याची सूत्रे घरापर्यंत?

Bmc Covid Khichadi Scam : संजय राऊतांची मुलगी आणि भावाच्या खात्यात लाखो रुपये जमा झाल्याची सूत्रांची माहिती

सरकारनामा न्युज ब्युरो, सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुंबई महापालिकेत कोविड काळात खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या खिचडी घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे थेट संजय राऊत यांच्या कुटुंबीयांपर्यंत असल्याची माहिती मिळत आहे. या घोटाळ्यातील पैसे मुख्य आरोपी राजीव साळुंखे यांच्या खात्यातून राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर राऊतांचे भाऊ संदीप राऊत आणि कन्या विधीता राऊत यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे पोलिस तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोविड काळात मुंबई महापालिकेने सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीला खिचडीचे कंत्राट दिले होते. त्यानंतर यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते आणि शिंदे गटातील नेत्यांनी केला होता. या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी तपास सुरू आहे. या प्रकरणात सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे यांच्या खात्यातून लाखोंचा निधी सुजित पाटकर यांच्या खात्यात जमा झाल्याचे पुरावे समोर आलेत. त्यानंतर ते पैसै सुजित पाटकर यांच्या खात्यात आणि पुढे राऊतांचे भाऊ संदीप राऊत आणि मुलगी विधिता यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती मिळत आहे.

घोटाळ्यातून पैसे कसे फिरवले?

सुजित पाटकर यांच्या खात्यातून संदीप राऊत यांच्या खात्यावर 7.75 लाख रुपये, तर विधिता राऊत यांच्या खात्यावर 14.75 लाख जमा झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. गंभीर बाब म्हणजे कोविड काळात खिचडी बनवण्याचे कंत्राट चुकीच्या पद्धतीने दिले आणि त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचेही समोर आले आहे. खिचडी बनवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कंपनीची कागदपत्रे दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

खिचडी बनवण्याचे कंत्राट संजय राऊत यांचे निकटवर्तीय बाळा कदम यांच्या मे. वैष्णवी किचनला (सह्याद्री रिफ्रेशमेंट) देण्यात आले. यातही कंपनीचा पत्ता चुकीचा दिल्याचे उघड झाले. शिवाय धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीकडे अन्न व प्रशासनाचा परवाना नसतानाही वाटाघाटी करून ते कंत्राट दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खिचडी वाटपातही फसवणूक

मुंबई महापालिकेने प्रति 300 ग्रॅम खिचडीसाठी 33 रुपये मंजूर केले होते. प्रत्यक्षात 300 ग्रॅमऐवजी 100 ग्रॅम खिचडीचे वाटप करून 5 कोटी 93 लाख 97 हजार 235 रुपये कंपनीला देण्यात आले. यातील 2 कोटी 73 लाखांच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

खिचडी वाटपाची वर्कऑर्डर मिळवून देण्यास मदत केल्याचे आणि खिचडी कन्सलटन्सी सर्व्हिसेस पुरवल्या म्हणून मे. एमएसपी असोसिएट्चे सुजित पाटकर यांना गैरलाभातून 45 लाख रुपये मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यातील 14.75 लाख रुपये विधिता राऊत आणि 7.75 लाख रुपये संदीप राऊत यांच्या खात्यात वळते केल्याचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत.

या सर्व प्रकरणामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पत्रावाला चाळ प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली संजय राऊत यांना तुरुंगात जावे लागले होते.

Edited by - Avinash Chandane

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT