Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray ) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारीच्या महामोर्चासंबंधी ट्वीट केलेल्या व्हिडिओच्या दाव्यामुळे आता नवा वाद उफाळून आले आहे.मराठा क्रांती मोर्चाचा एक व्हिडीओ राऊतांनी महामोर्चाचा व्हिडीओ असल्याचे ट्वीट केल्यामुळे राऊत यांच्यावर आता पोलिस तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच या मु्द्यावरून राऊत यांच्यावर टीकाही होत आहे. या व्हिडीओवरून आता स्वत: राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे.
संजय राऊत म्हणाले, मराठा समाजाचा मोर्चा आमचा नव्हता का? मी जो व्हिडीओ ट्विट केलाय, त्यात कुठे म्हणालो की, हा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. तुम्ही तो व्हिडीओ काळजीपूर्वक पहा. मी त्यात कुठेही दावा केला नाही की, हा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. मराठा मोर्चाला सुद्धा हे लोक नॅनो मोर्चा म्हणत होते. भाजपला इतकं कळवळून टीका करण्याचं कारण नाही.
"छत्रपता संभाजीराजे हे एक प्रगल्भ नेते आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या मुद्द्यावर आपण बोलत आहोत. भाजपच्या नादाला कुठे लागलात की, हा आमचा मोर्चा, तुमचा मोर्चा. छत्रपतींच्या अवमानाच्या मु्द्दा घेऊन आपण उभे आहोत ना. मग आपण त्याच्यावर बोलूयात, असा सल्ला राऊतांनी संभाजीराजेंना दिला.
"माझ्याविरोधात पोलिस तक्रार दाखल करा, काही हरकत नाही. भाजप वारकऱ्यांना हाताशी पकडू शकतो. त्यांचेच लोक पुढे करून इतर संघटना्च्या नावे तक्रार दाखल करू शकतो. आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि स्वत :च्या लोकांना क्लिनचीट द्यायचे हा भाजपचा अजेंडा आहे," असेही संजय राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.