Pune News : निवडणुकीत प्रचार केल्यामुळे पोलीस पाटलावर निलंबनाची कारवाई!

Pune News : उमेदवारांचे प्रचारपत्रक हातात घेऊन प्रचार करीत होते.
Pune News
Pune News Sarkarnama
Published on
Updated on

भोर : निवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेऊन, निवडणुकीत उभा असलेल्या उमेदवाराचा प्रचार केल्याच्या कारणास्तव अंगसुळे या गावातील (ता.भोर) पोलीस पाटील भानुदास मारुती तावरे यांच्यावर एक महिन्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.

Pune News
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये छप्परफाड मतदान!

पोलीस पाटील भानुदास तावरे यांनी जबाबदारी व कर्तव्यात कसूर करून, निवडणूक प्रचारात सहभाग घेतल्याचे तपास यंत्रणेत सिद्ध झाले. यामुळे भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी शनिवारी (ता.१७) उशीरा त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.पोलिस पाटील भानुदास तावरे हे गावातील श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी माता विकास पॅनेलच्या उमेदवारांचे प्रचारपत्रक हातात घेऊन प्रचार करीत असल्याची तक्रार प्रशासनाकडे आली होती. यानुसार पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी या प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल प्रांताधिका-यांकडे सादर केला होता.

Pune News
Love Jihad Act : 'लव्ह जिहाद' विरोधात पिंपरी व अमरावतीत मोर्चा!

तपास अहवालानुसार पोलिस पाटील भानुदास तावरे हे यामध्ये दोषी आढळून आले. भानुदास तावरे यांनी पोलिस पाटील नियुक्तीपत्रातील शर्ती व अटींचा भंग करून आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय त्यांच्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.त्यामुळे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार पोलिस पाटील भानुदास तावरे यांना एका महिन्यासाठी निलंबित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com