Sanjay Raut,Sandeep Deshpande sarkarnama
मुंबई

MNS : राऊत आता माध्यमांचा अनुशेष भरुन काढतील ; मनसेनं उडवली खिल्ली

Sandeep Deshpande : संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर तुटून पडत होते.

सरकारनामा ब्युरो

Sandeep Deshpande : ठाकरे गटाचे नेते, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पीएमएलए कोर्टानं जामीनावर सुटका केली आहे. यावर महाविकास आघाडीसह अन्य काही नेत्यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावर खोचक टीका केली आहे.

"संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे, ते आता माध्यमांचा अनुशेष भरुन काढतील," अशा मिश्किल शब्दात संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांच्या जामीनावर निशाणा साधला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, त्यात संजय राऊत यांची मोठी भूमिका होती. राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर राऊत सरकारची भूमिका ठामपणे मांडत होते.शिवसेनेत फूट पडून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतरही राऊतांचा आक्रमकपणा कमी झाला नव्हता. ते रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर तुटून पडत होते.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीनं अटक केल्यानंतर राऊतांचे माध्यमांशी बोलणं बंद झाले. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे. देशपांडे यांच्या राऊत काय उत्तर देणार हे काही दिवसातच समजेल.

ता. 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरपासून संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहात होते. राऊतांना पोलिस कोठडी आणि नंतर त्यांची न्यायालयीन कोठडी झाली. तेव्हापासून राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत. ईडीने त्यांच्या जामीनाला विरोध केला होता. त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात प्रविण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT