ED : पीएमएलए कोर्टाचा ईडीला दणका, राऊतांना दिलासा ; लवकरच जेलमधून घरी येणार

Sanjay Raut : ईडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राऊतांचा घरी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
sanjay raut Latest News
sanjay raut Latest Newssarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेची मुलुखमैदान तोफ संजय राऊत सुमारे शंभर दिवसानंतर आर्थर रोड कारागृहाबाहेर येणार आहेत. त्यांना आज जामीन मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला ईडीने विरोध केला होता. यावर पुन्हा दुपारी सुनावणी झाली. यावेळी ईडीची ही मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राऊतांचा घरी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने ईडीला हा मोठा दणका दिला आहे.

ता. 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरपासून संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहात होते. राऊतांना पोलिस कोठडी आणि नंतर त्यांची न्यायालयीन कोठडी झाली. तेव्हा पासून राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत. ईडीने त्यांच्या जामीनाला विरोध केला होता. त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

sanjay raut Latest News
Bharat Jodo Yatra : सुरक्षा भेदत बांधावर सरसर चढत राहुल गांधींनी युवकांशी साधला संवाद..

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात प्रविण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी राऊतांच्या जामीनानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पिंजऱ्यांतून वाघाची सुटका होत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावरुन "वाघ अखेर पिंजऱ्यांतून बाहेर आला," असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे, असे दिसते. महाविकास आघाडीतील नेते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनीही राऊतांच्या जामीनावर आनंद व्यक्त केला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टि्वट करीत राऊतांच्या जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे यांनी टि्वट करीत राऊतांच्या जामीनावर आनंद व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अंधारेंना अश्रू अनावर झाले. "टायगर इज कम बॅक," असे टि्वट सुषमा अंधारेंनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com