sanjay raut Latest News
sanjay raut Latest News sarkarnama
मुंबई

संजय राऊतांना दिलासा नाहीच; यंदाचा दसरा कोठडीत...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबईतील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

आज राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ईडीकडून (ED) राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून सध्या राऊत हे आर्थर रोड कारागृहात असून, त्यांचा तेथील मुक्काम वाढला आहे. (sanjay raut Latest News)

राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र त्यांनी जामीनसाठी अर्ज केला आहे. यावरील सुनावणी ही विशेष पीएमएलए न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीवेळी राऊत हे न्यायालयात उपस्थित होते. यावेळी राऊतांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण असून यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. यामुळे राऊतांचा मुक्काम कारागृहात वाढला आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राऊतांना मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेला आहे.

दरम्यान, राऊतांच्या जामीन अर्जावरील पुढील होणाऱ्या सुनावणीवेळी ईडीच्या बाजूने युक्तिवाद केला जाणार असून १० ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणातीची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे राऊतांचा यंदाचा दसरा हा न्यायालयीन कोठडीचत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यापूर्वी झालेल्या सुनावणीत ईडीकडून राऊतांच्या जामीनास जोरदार विरोध करण्यात आला होता.

दरम्यान,संजय राऊत हे प्रभावशाली राजकीय नेते असल्याने ते तुरुंगातून बाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे राऊत यांना जामीन देऊ नये,असे ईडीकडून सांगितले गेले आहे. दरम्यान राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असून त्यांच्या पक्षाकडून अर्थात शिवसेनेकडून त्यांना सन्मान म्हणून मुंबई गोरेगाव येथे पार पडलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात राखीव खुर्ची ठेवण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT