मुंबई : विशेष पीएमएलए न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. संजय राऊत यांना ईडीने 1 ऑगस्ट रोजी पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात अटक केली होती. आज त्यांची कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.विशेष PMLA कोर्टानं हा राऊतांची कोठडी वाढवली आहे. यापूर्वी 4 ऑगस्ट आणि 8 ऑगस्टला त्यांची कोठडी वाढवण्यात आली होती.
संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 5 सप्टेंबर वाढ करण्यात आली होती. त्यामुळे राऊत यांना आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
आज विशेष पीएमएलए न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर यामध्ये राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.
ते सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहेत. संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडीत घरचं जेवण दिलं जाईल. जेलच्या डॅाक्टरकडून संजय राऊत यांची तपासणी केली जाईल, असं न्यायालयानं 8 ऑगस्टला म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.