Sanjay Raut
Sanjay Raut  
मुंबई

राऊत यांनी फुटिरांची नावेच सांगितली: संजय शिंदे, भुयार आणि श्यामसुंदर शिंदे

सरकारनामा ब्युरो

Rajyasabha Election 2022

मुंबई : ''घोडे बाजारामध्ये जी लोकं उभी होती त्यांची सहा-सात मते आम्ही घेऊ शकलो नाही.आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांचे एकही मत फुटले नाही, पण कोणी शब्द देऊन दगाबाजी केली आहे त्यांची नावे आमच्याकडे आहेत, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट नावंच सांगितली. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, राजेश पाटील, देवेंद्र भुयार (अपक्ष), संजय मामा शिंदे (अपक्ष), श्यामसुंदर शिंदे (अपक्ष) यांची मत आम्हाला मिळाली नाहीत. असे संंजय राऊत यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. मविआची 9 मते फुटली आहेत. धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे (Shivsena) संजय राऊत, काँग्रेसचे (Congress) इमरान प्रताप गढी, राष्ट्रवादीचे (NCP) प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे हे पहिल्या फेरीतच विजयी झाले आहे. मात्र महाविकास आघाडीची १० मते फुटल्याने सहाव्या जागवरचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला.

फुटलेल्या अपक्ष आमदारांवर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, आमचा एक उमेदवार विजयी होऊ शकला नाही. ज्या कारणासाठी शिवसेनेचं एक मत बाद केलं. त्याच प्रकारचा आक्षेप आम्हीही घेतला होता. तशीच चूक भाजपनेही केली होती पण त्यांची मतं बाद नाही झाली. निवडणूक आयोगाने त्यांची मते बाद नाही केली. सात तास घेतले. एक व्हिडीओ तपासायला सात तास लागतात, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

घोडे बाजारामध्ये जी लोकं उभी होती त्यांची सहा-सात मते आम्ही घेऊ शकलो नाही. बाजारातले काही घोडे विकले गेले त्यांना जास्त बोली लावली असेल. पण घोडे बाजारात या घोड्यांमुळे कुठल्याही सरकारला धोका होत नाही. घोडे जिथे हरभरे टाकतील तिथे जातात. असा खोचक टोला त्यांनी फुटलेल्याा आमदारांना लगावला. तसेच, हे सीबीआय इडी, केंद्रीय यंत्रणांचा वापरतात पण आता केंद्रीय निवडणूक आयोगाचावरही दबाव टाकला जात असल्याचे आम्ही काल डोळ्यांनी पाहिलं. आम्ही व्यापार केला नाही. पण यांना पहाटेची सवय आहे. यांचा पहाटेचा उपक्रम होता त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.

तुम्ही छत्रपतींना का उमेदवारी नाही दिली ?तुमचं राजेंवर इतकं प्रेम होतं तर धनंजय महाडिक यांच्या जागेवर त्यांना निवडून आणायला पाहिजे होतं. असंही संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, विधान परिषदेत शिवसेनेच्या दोन जागा निवडून येतील राष्ट्रवादीच्या दोन जागा निवडून येतील आणि काँग्रेसचाही एक उमेदवार निवडून येईल इतके काँग्रेस कडे संख्याबळ आहे. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT