Rajya Sabha Election Result 2022 : अनिल बोंडे याचं 'ते' विधान खरं ठरलं !

महाविकास आघाडीतील एक संजय जाणार, सायंकाळपर्यंत कोणता ते कळेल," असं बोंडे म्हणाले होते.
Rajya Sabha Election 2022
Rajya Sabha Election 2022 sarkarnama
Published on
Updated on

पुणे : राज्यसभा (Rajya Sabha Election Result 2022) निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचा पराभव झाला. कोल्हापुरातील संजय पवार हे पराभूत झाले आहेत. काल (शुक्रवारी) मतदानानंतर भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी एक विधान करुन खळबळ उडवून दिली होती. शनिवारी पहाटे लागलेल्या निकालावरुन बोंडे यांचे 'ते' विधान खरे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काल दुपारी माध्यमांशी बोलताना अनिल बोंडे यांनी 'आम्हीच जिंकू' असा दावा केला होता. बोंडे यांनी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत, शिवसनेचे उमेदवार संजय पवार यांच्यावर काल निशाणा साधला होता.

"राज्यसभेच्या तीनही जागा आम्ही जिंकू. आम्हाला आत्मविश्वास आहे. आमच्या मनात या जागेबाबत अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला त्याप्रमाणे या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणतातरी एक संजय जाणार," असे विधान बोंडेंनी काल केलं होते.

Rajya Sabha Election 2022
Rajya Sabha : कोणते आमदार फुटले ? परब, देसाईंवरचा विश्वास ठाकरेंना नडला

"कोणता अश्वत्थामा गेला होता, हे देखील धर्मराजाने सांगितले नव्हते. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते नंतर कळेल. पण, महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार नक्की. सायंकाळपर्यंत कोणता ते कळेल," असं बोंडे म्हणाले होते. आज (शनिवारी) पहाटे निकालानंतर संजय पवार यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बोंडेंनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

अत्यंत चुरशीने झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची दहा मते फुटली व सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनंतर शनिवारी पहाटे साडेतीन वाजता पहिला निकाल जाहीर करण्यात आला. पहिल्या पसंतीची मते मिळवून प्रफुल्ल पटेल (४३ मते), संजय राऊत (४१ मते), पियूष गोयल (४८ मते), अनिल बोंडे (४८ मते), इम्रान प्रतापगढी (४४ मते) विजयी झाले. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवेनेच्या संजय पवार यांचा पराभव पराभव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com