Sanjay Raut : Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : राऊतांना 'सुपारी'ची 'खबर' देणाऱ्याचा 'जबाब' शिंदे गटाकडे : तक्रार दाखल करण्याचा इशारा..

Sanjay Raut : ठाणे किंवा पुणे मेंटल हॉस्पिटल मध्ये त्यांना पाठवा...

Akshay Badve

Naresh Mhaske : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुंड राजा ठाकूरकडे आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप केला होता. या आशयाचे पत्र राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस आयुक्तांना लिहले होते. या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

नरेश म्हस्के म्हणाले, "संजय राऊत यांचा भांडा फोड झाला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात उदव्याप सुरू आहेत. राऊत यांचे डोकं फिरलं आहे, तुरूंगातून बाहेर आल्यावर त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे, त्यांना ठाणे किंवा पुण्यात मेंटल हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचाराची गरज त्यांना आहे, असा घणाघाती प्रहार म्हस्के यांनी केला.

ते पुढे म्हणाले, "पोलिस अधिकारी याप्रकरणी आज राऊत यांच्याकडे जबाब घेण्यासाठी गेले होते. जबाब देताना संजय राऊत यांनी म्हंटले आहे की, "सामना मधील एका व्यक्तीने त्यांना सांगितले की, राजा ठाकूर आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली की, माझ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न होणार आहे, हल्ला होणार आहे, असे राऊतांनी जबाबात सांगितले असल्याचे," म्हस्के म्हणाले.

"सामना मधील काम करत असलेल्या याच व्यक्तीने दुसरीकडे जबाब मध्ये असे सांगितले आहे की, ठराविक असे कोणत्याही आमदार, खासदार यांचे नाव घेऊन ते त्यांच्यावर हल्ला करणार याबाबत काहीही एक सांगितलेलं नाही. श्रीकांत शिंदे आणि राजा ठाकूर यापैकी कोणत्याही व्यक्तीचे नाव घेऊन ते बोलेलेलो नाही," असेही म्हस्के यांनी आपल्या म्हंटले.

"जे उरलेले शिवसैनिक आहेत त्यांच्यात चर्चा आहे की, संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचे धनुष्य बाण चिन्ह गेले म्हणून, त्यांनी हे आरोप केले आहेत. काहीच वेळात संजय राऊत यांच्यावर अर्धा तासात तक्रार दाखल करू आणि गुन्हा दाखल होईल," असा इशाराही राऊतांना म्हस्के यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT