Sharad Pawar News : असे कधीही घडले नाही' हे सर्व भाजपच्या नेत्यांनी घडवले; आयोगाच्या निर्णयावर पवार स्पष्टच बोलले

Chinchwad by-election : चिंचवड आणि कसबा पोटनिवणुकीचा प्रचार अंतीम टप्प्यात आला आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama

Pimpri-Chinchwad News : चिंचवड आणि कसबा पोटनिवणुकीचा प्रचार अंतीम टप्प्यात आला आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीचे मोठे नेते या प्रचारात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चिंचवड मतदार संघामध्ये आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला.

या वेळी पवार म्हणाले, ''भाजप राज्यात वाढण्यात खरा वाटा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. त्यांच्या काळात भाजपचे मुख्यमंत्री झाले नाही तर मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रच्या जनतेने बाळासाहेबांना शक्ती दिली. बाळासाहेबांचा स्वभाव होता की जो सहकारी असेल त्याला साथ द्यायची. मात्र, ज्या सहकाऱ्याला साथ दिली त्यानेच हळूहळू ज्यांनी आपल्याला मोठे केले त्यांना बाजूला केले. देशाच्या इतिहासात कधी पाहिले नाही की निवडणूक आयोगाने एखादा पक्ष, त्याची निशाणी या सगळ्या गोष्टी दुसऱ्याला देऊन टाकल्या.''

Sharad Pawar News
Supreme Court hearing : सिब्बलांच्या युक्तीवादावर सरन्यायधीशांचा महत्त्वाचा प्रश्न; सिब्बल म्हणाले...

''पण हे घडले. हे सर्व भाजपच्या नेत्यांनी घडवले. आज मत मागण्यासाठी आम्ही येतोय त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ही नवी राजकीय संस्कृती देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी संघटना उभी केली. शिवसेनेचा अर्थ बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने उभी झालेली संघटना!

आज ही संघटना कोणी चालवायची याबद्दल बाळासाहेबांनी सांगितले होते, की संघटेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करतील. भाजपमधील काही लोकांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे पद काढून घेतले. शिवसेनेमधून काही पन्नास आमदार बाहेर पडून त्यांनी संपूर्ण राज्याची सत्ता हातात घेतली. आता शिवसेना आमचीच असे ते सांगत आहेत.'', असा टोला पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेताल लगावला.

''राजकारणात इतकी फसवेगिरी कधी नव्हती, ती अलीकडच्या काळात आली आहे. हे महाराष्ट्रात वाढणे योग्य नाही. हे लोकांमध्ये जाऊन सांगावे यासाठी नाना काटे यांच्या निवडणूक प्रचाराची संधी आहे, म्हणून मी याठिकाणी आलो. आता जरी मी निवडणूक लढवत नसलो तरी महाराष्ट्रात जर चुकीच्या प्रवृत्ती वाढत असतील आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सरळमार्गी नेत्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असेल तर स्वस्थ बसून चालणार नाही. असे करणाऱ्या लोकांना त्यांची योग्य जागा दाखवली पाहीजे. ही संधी आज आली आहे,'' असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar News
Supreme Court hearing : ठाकरे गटाला मोठा दिलासा; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले...

''आज हिंजवडीसारखा परिसर पाहिला तर हजारो लोक याठिकाणी आयटी क्षेत्रात काम करतात. पुणे आणि परिसर संपूर्ण जगाशी संपर्क ठेवण्यात यशस्वी झाला आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आता आयटीचे, नव्या कारखानदारीचे माहेरघर झाले आहे. अशाच पद्धतीने हा सर्व भाग आपल्याला बदलायचा आहे.'' त्यासाठी विचारी नेतृत्व आणले पाहीजे. त्याकरता जे प्रयत्न सुरु आहेत त्यामागे तुमची शक्ती उभी करून महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याचे काम आपल्याला करायचे आहे. चिंचवड विधानसभेत नाना काटे यांना यासाठी मोठ्या मतांनी विजयी करा, असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com