Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री अदानींचे दलाल 

Sanjay Raut On CM Shinde : खासदार संजय राऊत यांचा सरकारवर हल्लबोल 

Sudesh Mitkar

Mumbai News : धारावीमध्ये जो मोर्चा निघाला त्याची चेष्टा मुख्यमंत्री करत आहे. मात्र एका भांडवलदाराच्या घशात हि मुंबई घालायचे काम हे सरकार करत असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अदानींची दलाली करत आहेत. त्याच्या विरुद्ध आमचा संघर्ष असल्याचे सांगत  खासदार संजय राऊत यांनी सरकारांवर हल्लाबोल केला.

राऊत म्हणाले, कालचा मोर्चा हा इशारा मोर्चा होता. मोर्चाला लोक कुठून अली हे प्रश्न विचारण्या पेक्षा त्या मोर्चाचा उद्देश हा अदानीच्या घशातून मुंबई काढा हा होता. त्याकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संसद घुसखोरी बाबत राहुल गांधींनी केलेल्या विधानावर बोलताना राऊत म्हणले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसद घुखोरी बाबत केलेले विधान सत्य असून देशात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. बेरोजगारीमुळे तरुणाई मानसिक तणावात आहे. त्यामुळे रामल्लाचे फुकट दर्शन देऊन बेरोजगारीची समस्या सुटणार नाही. देशात घडणाऱ्या या घटनांना मोदी सरकारची धोरणे जबाबदार आहेत.

शनिवारी  निघाला होता मोर्चा अदानी समूहाला दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांनी शनिवारी  मोर्चा काढला. या मोर्चातून उद्धव ठाकरे यांनी अदानींसह राज्यातील सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. हा जगातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. यावर  अदानी समूहाकडून एक पत्रक जारी करण्यात आले. या पत्रकातून मोठा दावा करण्यात आला असून एक प्रकारे उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेतील अटी या महाविकास आघाडी सरकारच्या काळात निश्चित झाल्या होत्या, असे अदानी समूहाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT