Delhi News : संसद भवनातील घुसखोरीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषय असल्याने राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर राजकारण करू नये, असे आवाहनही मोदींनी केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी हे भाष्य केले आहे. या घटनेची सखोल चौकशीचीही मोदींनी सुतोवाच केले आहे. (Latest Marathi News)
पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच सरकारमधील मंत्र्यांना लोकसभेच्या सुरक्षाबाबत गंभीर दखल घेण्याचे निर्देश दिले आहेत. "ही घटना गांभीर्याने घ्या. राजकारण करू नका. आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे," असे त्यांनी गुरुवारी मंत्र्यांच्या बैठकीत सांगितले. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीसाठी सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल शनिवारी (ता. 17 डिसेंबर) सभागृहाच्या सदस्यांना सांगितले की, त्यांनी संसद संकुलातील सुरक्षेच्या विविध बाजूंचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 13 डिसेंबरसारखी घटना पुन्हा घडू नये, यासाठी समिती ठोस उपाययोजनांवर विचार करेल,' असे ते म्हणाले.
बिर्ला यांनी लोकसभा सदस्यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, 'केंद्रीय गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने आपले काम सुरू केले आहे. त्याचा अहवाल लवकरच सभागृहासमोर मांडला जाईल.' लोकसभा अध्यक्षांनी संसदेच्या सुरक्षेमध्ये झालेल्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाल्याबाबत खासदारांना पत्र लिहून संसदेच्या सुरक्षेत कसूर झाल्याने घटना घडल्याचे स्पष्ट केले आहे.
संसदेच्या नवीन इमारतीत सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्वांच्या सहमतीने घेतलेल्या निर्णयाच्या आधारेच ही कार्यवाही करण्यात आल्याचे बिर्ला यांनी सांगितले. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचा संदर्भ देत बिर्ला यांनी खासदारांना आवश्यक आणि प्रभावी कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.