Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On Gujrat Election : भाजप-आप मध्ये साटंलोटं झालंय का? राऊतांचा आरोप!

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut On Gujrat Election : गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे कल यायला सुरूवात झाली आहे. गुजरातमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे, तर हिमाचल प्रदेशात भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर होताना दिसत आहे. या सुरूवातीच्या निवडणुकींच्या आकडेवारीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, भाजप आणि आप मध्ये सेंटिंग झाली आहे का? अशी शंका त्यांनी बोलून दाखवली.

संजय राऊत म्हणाले, दिल्लीत भारतीय जनता पक्षाची १५ वर्षांची सत्ता आपने खेचून घेतली. गुजरातचा निकाल अपेक्षित आहे. तिथेही आप आणि अन्य पक्षांनी एकत्र येत आघाडी केली असती तर, तर नक्कीच काटेची लढत झाली असती. आप आणि भाजपमध्ये दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला द्या, असं सेटिंग झाले आहे का? अशी शंका लोकांना वाटतं.

हिमाचल प्रदेशमध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेस काटे की लढत देत आहे. हे चित्र आशादायी आहे. तीन प्रमुख निवडणुकांमध्ये गुजरात भाजपला मिळालंय. दिल्ली हातून गेलंय.हिमाचलमध्ये संघर्ष करावं लागतंय. म्हणजे तीन विरूद्ध एक असा हा सामना झालाय, असे संजय राऊत म्हणाले.

विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मतविभागणी टाळणं आवश्यक आहे. आपसातले अहंकार, हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र लढाई केली, तर २०२४ मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचे हे निकाल आहेत. जर सगळे विरोधक एकत्र येऊन भाजपला लढत देऊ शकतात, गुजरातमध्येही २०२४ ला परिवर्तन होईल, असे संजय राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT