Devendra Fadanvis : 'सत्यजीत तांबेंना भाजपची ऑफर : फडणविसांनी स्पष्टच सांगितलं!

Devendra Fadanvis : सत्यजीत तांबे यांच्या सिटीझनविल’या मराठीत अनुवादीत पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम.
Devendra Fadanvis :
Devendra Fadanvis :Sarkarnama

Devendra Fadanvis : अलीकडील काळात इतर पक्षाच्या नेत्यांची भाजपमध्ये प्रवेश करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये दाखल झाले होते. याबाबतच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मजेशीर वक्तव्य करत काँग्रेसच्या सत्यजीत तांबेंना भाजपात य़ेण्याची ऑफर दिली आहे. 'सत्यजीतला जास्त दिवस बाहेर ठेऊ नका, नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसं जमाच करायची असतात, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis :
Gujarat Election 2022 Updates : पंधरा मिनिटामध्ये गुजरातमध्ये भाजपच शतक

काँग्रेसचे तरूण नेते सत्यजित तांबे यांच्या सिटीझनविल’या मराठीत अनुवादीत पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम काल ( ७ डिसेंबर ) पार पडला. कॅलिफोर्निया राज्य गव्हर्नर, गॅविन न्यूसम यांच्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचं तांबे यांनी मराठीत अनुवाद केले आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर हे ही या वेळी उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना फडणवीस यांनी टोलेबाजी केली.

Devendra Fadanvis :
Himachal Pradesh Results 2022 : सुरूवातीच्या कलांच्या आकडेवारीत काँग्रेस-भाजपमध्ये काटे की टक्कर!

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सत्यजीत तांबे यांना मी अनेक वर्षांपासून बघत आलेलो आहे. राजकीय नेत्यांमध्ये जे वेगळेपण असतं, ते सत्यजित मध्ये आहे." मंचावर उपस्थित बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, “बाळासाहेब थोरात तुमच्याकडे माझी एक तक्रार आहे. सत्यजीत सारखे नेते, तुम्ही कितीदिवस बाहेर ठेवणार आहात. सत्यजीतला जास्त दिवस बाहेर ठेऊ नका, नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसं जमाच करायची असतात,” असे फडणवीस म्हणाले. या विधानातून फडणवीसांनी अप्रत्यक्षपणेच तांबेंना भाजपात दाखल होण्याची ऑफरच दिली.

या कार्यक्रमास विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवारही उपस्थित राहणार होते. मात्र यावेळी पवार कार्यक्रमास येऊ शकले नाही. यामुळे फडणवीस आणि अजितपवार एकाच मंचावर येण्याचा प्रसंग टळला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com