Kangana Ranaut | Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : कंगनाच्या 'डिमांड'नं संजय राऊतांनीही डोक्याला हात लावला; नेमकं काय घडलं?

Akshay Sabale

Parliament Session 2024 : मोदी '3.0' सरकारच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्री, खासदारांनी संसदेत शपथ घेतली. यात मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेली अभिनेत्री, खासदार कंगना रनौतचा देखील समावेश आहे.

यानंतर कंगना रनौतनं महाराष्ट्र सदनला भेट दिली. यावेळी कंगनानं राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कक्षाची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र सदनमधील अन्य खोल्या लहान आहेत. त्यामुळे कंगनानं थेट मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी केली. कंगनाच्या मागणीनंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत सुद्धा आश्चर्यचकीत झाले आहेत.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'एक्स' अकाउंटवर एक ट्विट केलं आहे. "बापरे! श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी.

हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजींना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहात आहेत श्रीमतीजी," असं संजय राऊतांनी म्हटलं.

नेमकं घडलं काय?

नवनिर्वाचित खासदार असलेल्या कंगनाला (Kangana Ranaut) अद्याप शासकीय निवासस्थान मिळालेलं नाही. निवासस्थान मिळेपर्यंत कंगना महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची माहिती पुढे आली. तिनं महाराष्ट्र सदनात जाऊन काही खोल्यांची पाहणी केली.

सदनातील अधिकाऱ्यांनी तिला पहिल्या मजल्यावर नेलं. कंगना मुंबईची रहिवासी असल्यानं तिनं अधिकाऱ्यांना खोली देण्याची विनंती केली होती. अधिकाऱ्यांनी कंगनाला एक खोली दाखवली. पण, ती तिला पसंत पडली नाही.

यानंतर कंगनाला आणखी एक खोली दाखवण्यात आली. ही खोली राज्यातील मंत्र्यांना दिली जाते. त्या खोलीसही कंगनानं नकार दिला. शेवटी कंगनानं मुख्यमंत्र्यांच्या कक्षाची मागणी केली. पण, प्रोटोकॉलनुसार हा खोली मुख्यमंत्र्यांशिवाय कोणाला देता येत नाही, असं अधिकाऱ्यांकडून तिला सांगण्यात आलं. नंतर कंगनानं महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला फोन केला. मात्र, नेत्यानंसुद्धा तिची मदत केली नसल्यानं ती निराश झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT