Maharashtra Politics : पुण्यातील ड्रग्जप्रकरणावरून महायुतीत वादंग पाहायला मिळत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्याकडे बोट दाखवलं होतं. यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. आता मिटकरींना आमदार प्रवीण दरेकर यांनी खडसावलं आहे.
नेमकं घडलं काय?
पुण्यातील ड्रग्जच्या व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केली आहे. दुसरीकडे विरोधकांनी सरकारला घेरलं असतानाचा महायुतीमधील नेते देखील एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माझ्या काळात असं घडलं नाही, असं म्हणत विद्यमान पालकमंत्री अजित पवार यांच्यावर बोट दाखवलं होतं.
यानंतर अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं. "चंद्रकात पाटील पालकमंत्री असताना अंमली पदार्थांच्या सुळसुळाटाला उत्तेजन मिळालं होतं. पब, अंमली पदार्थ, हफ्ता वसुली, डान्स बारला चंद्रकांत पाटील यांच्या काळात राजाश्रय होता.
पण, अजित पवार पालकमंत्री असल्यामुळे सगळ्या गोष्टी उघडकीस येत आहेत. चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होता. अजितदादांनी याचं समर्थन न केल्यानं या गोष्टी उघडकीस येत आहेत," असं मिटकरींनी म्हटलं होतं.
चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मिटकरींना सुनावलं आहे. "अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे. त्यांची बाष्कळ बडबड असते. मागच्या एका प्रकरणात त्यांना प्रदेशाध्यक्ष यांनी समज दिली होती. महायुतीत तडे जाणार नाही, असं वक्तव्य त्यांनी करून नये. आपण बोलून जाता ते महायुतीला हानिकारक आहे," असं म्हणत दरेकरांनी मिटकरींची खरडपट्टी काढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.