Sanjay Raut sarkarnama
मुंबई

Sanjay Raut praises Kunal Kamra: संजय राऊतांचं कुणाल कामाराबाबत मोठं विधान, म्हणाले ''ये तो…''

Sanjay Raut News : महाराष्ट्रात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Kunal Kamra controversy : सध्या महाराष्ट्रात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राजकीय वातावरण तापवलेलं आहे. विशेष करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसैनिक कामराविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे कामरा देखील माघार घेण्याच्या भूमिकेत दिसत नाही. त्यात आता कामराच्या पाठिशी विरोधी पक्षातील नेते खासकरून ठाकरे गटाचे नेते उभा राहिल्याचे दिसून येत आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने खासदार संजय राऊत यांनी कामराचे कौतुक केले आहे.

संजय राऊत यांनी कामराचं कौतुक करताना त्यांच्या एक्स या सोशल मीडिया हॅण्डलरवर म्हटल आहे की, ‘’ये तो अपून जैसा निकला…ये भी झुकेगा नही साला!! जय महाराष्ट्र!’’ विशेष म्हणजे या पोस्टसोबत संजय राऊत यांनी कामराचा नवीन व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये कुणाल कामराने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचलेले आहे. खरंतर कुणाल कामराच्या शोधात मुंबई पोलिस आहे. तो तमिळनाडूमध्ये असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर त्याने पुन्हा एकदा एका गाण्याचा नवा व्हिडीओ ट्विट करत आपल्या विरोधकांना ललकारलं आहे. ‘हम होंगे कामयाब...’ या गीताच्या चालीवर त्याने ‘हम होंगे कंगाल...’ असे त्याने गायलेले गीत पोस्ट केले आहे. विकसित भारताचे गीत, असे त्याने उपाहासात्मक नाव दिले आहे.

‘हम होंगे कंगाल...’ या गीतामध्ये कामराच्या स्टुडिओमध्ये झालेल्या तोडफोडीचे फोटो, व्हिडीओ दाखवण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांचाही फोटो दाखवण्यात आला आहे. गीतामध्ये चोहोबाजूने दंगे, पोलिसांचे पंगे, नथूराम गोडसे, आसाराम, बेरोजगारी हे मुद्दे घेत निशाणा साधला. एकप्रकारे कामराने शिवसेनेला डिवचल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग सहन केला जाणार नाही, असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा यांनी केलेल्या टिकात्मक कवितेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले होते.

खासदार संजय राऊत यांनी गुवाहाटीला पळून गेलेले गद्दार नव्हते का?. हा गद्दारीचा इतिहास देखील तुम्ही लोक बदलणार आहात का? असा प्रश्न केला. सबंध महाराष्ट्रात गद्दार कोण? हे सगळ्यांना माहित आहे. तरीही मुख्यमंत्री त्यांची बाजू का घेतात, या शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांना सुनावले होते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT