
Kunal Kamra controversy : प्रसिद्ध अभिनेत्री अन् हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार कंगना रनौत यांनी कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या काव्यात्मक टिप्पणीवरून निर्माण झालेल्या वादंगानंतर प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली आहे.
कंगना रनौत(Kangana Ranaut) म्हणाल्या, दोन मिनिटांच्या प्रसिद्धिसाठी दुसऱ्यांचा अपमान नाही केला पाहिजे. संसदेबाहेर मीडियाशी बोलताना खासदार रनौत म्हणाल्या, जेव्हा एखादी व्यक्ती केवळ दोन मिनिटांच्या प्रसिद्धिसाठी असं करते, तेव्हा आपण विचार केला पाहिजे की आपला समाज कोणत्या दिशेने जात आहे. तुम्ही कुणीही असू शकता, परंतु कुणाचा अपमान आणि बदनामी करणे...एक व्यक्ती जिच्यासाठी तिचा सन्मानच सर्वकाही आहे आणि तुम्ही त्यांचा अपमान आणि अवहेलना करत आहात.
तसेच ही लोकं कोण आहेत आणि त्यांची ओळख काय आहे? जर ते लिहू शकत असतील तर त्यांनी साहित्यामध्ये असं करायला हवं. कॉमेडिच्या नावाखाली लोकांचा आणि आमच्या संस्कृतीचा अपमान करणे... हे कायदेशीरित्या केलं गेलं आहे, परंतु माझ्यासोबत जे केलं गेलं, ते अवैधरित्या केलं गेलं होतं. त्यामुळे मी दोन्ही घटनांची तुलना करणार नाही. असंही रनौत यांनी स्पष्ट केलं.
रविवारी कुणाल कामराने मुंबईतील यूनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटेट स्टुडिओत आपला स्टँडअप कॉमेडी नया भारत सादर केला, ज्यामध्ये त्यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर व्यंगात्मक टिप्पणी केली. ज्यात त्यांनी एक विडंबनात्मक गाणं गायलं आणि त्यात एकनाथ शिंदेंच्या(Eknath Shinde) नावाचा उच्चार न करता त्यांना अपमान केल्याचे समोर आले. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे.
यावर बोलताना खासदार कंगना रनौत म्हणाल्या, तुम्ही कुणाशी सहमत आहात की नाही, त्यांची चेष्टा करणे, विशेषकरून माझ्यासोबत घडलेल्या एका बेकायदेशीर घटनेवरून थट्टा करणे, योग्य नाही. मी त्या घटनेची तुलना या घटनेशी करणार नाही. कारण ती बेकायदेशीर होती, परंतु ही पूर्णपणे कायदेशीर आहे. ही लोकं त्यांची चेष्टा करत आहेत? त्यांच्याकडे काय योग्यता आहे? त्यांनी आयुष्यात काय मिळवलं आहे? असं म्हणत कामरावर टीका करत, रनौत यांनी सांगितले की, कुणाचा अपमान करणे योग्य नाही. कॉमेडिच्या नावाखाली तुम्ही कुणाची अवहेलना नाही करू शकत.
तसेच, खासदार रनौत म्हणाल्या की, कॉमेडिच्या नावाखाली कुणाचा अपमान करणं चुकीचं आहे. तुम्ही कुणी असाल परंतु कुणाचा अपमान करणं योग्य नाही. तुम्ही कॉमेडीच्या नावावर कुणाचा तरी अपमान करत आहात, तुम्ही त्यांच्या कामाची अवहेलना करत आहात. शिंदेजी खूप आधीपासून ऑटो रिक्षा चालवत होते आणि त्यांनी त्यांच्या हिंमतीवर खूप काही मिळवलं आहे, कुणाल कामराची ओळख काय आहे?
कंगना रनौत म्हणाल्या, एक व्यक्ती जे म्हणतो त्याचे परिणाम असू शकतात आणि त्यांनी विचारले की, जसं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस(CM Fadnavis) यांनी सांगितले की, आपल्याला जे काही म्हणायचं आहे, त्यासाठी काही जबाबदारी घ्यावी लागेल. त्याचे परिणाम असू शकतात. मग तुम्ही त्यावर ठाम राहाल का?, जेव्हा तुमची कायदेशीररित्या चौकशी केली जाईल.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.