Sanjay Raut, Priyanka Chaturvedi 
मुंबई

Sanjay Raut Vs Priyanka Chaturvedi : संजय राऊतांवर प्रियांका चतुर्वेदींची उघडपणे नाराजी; फाडफाड बोलल्या, नेमकं काय घडलं?

Albania protests, Priyanka Chaturvedi reaction : सर्व देशांनी अल्बानियातील घटनांपासून धडा घेतला पाहिजे, असे सांगतानाच संजय राऊतांनी विशेषत: भारत, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

Rajanand More

Sanjay Raut Albania post : जगातील काही देशांमध्ये आंदोलनं भडकली असून तेथील संसद, सरकारी कार्यालये, सार्वजनिक मालमत्तांवर हल्ले केले जात आहेत. अल्बानियामध्ये तर लोकांनी तेथील सर्वोच्च न्यायालयाला आग लावली आहे. फ्रान्स, इटली या देशांमधील जनताही सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. याच देशांमधील हिंसाचाराचे उदाहरण देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे.

संजय राऊत यांनी सोमवारी रात्री 'एक्स'वर अल्बिनियातील अग्नितांडवाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. राऊतांनी म्हटले आहे की, अल्बानियात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले. सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्याने लोक भडकले होते. आंदोलक जनतेने संसद आणि सरकारी कार्यालयांवर,मंत्र्यांच्या घरांवर देखील हल्ले केले आहेत.

सर्व देशांनी या घटनांपासून धडा घेतला पाहिजे, असे सांगतानाच राऊतांनी विशेषत: भारत, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. राऊतांच्या या पोस्टवरून भाजपसह एनडीएमधील अनेक पक्षांनी त्यावर आक्षेप घेतला. एवढेच नाही तर राऊतांच्या पक्षातील नेत्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही त्यावर आपली नाराजी बोलून दाखविली आहे.

चतुर्वेदी यांनी माडियाशी बोलताना सांगितले की, भारताला इतर कोणत्याही देशाकडून शिकण्याची गरज नाही. अल्बानिया हा एक छोटा देश असून अनेक वर्षे कम्युनिस्ट हुकुमशाही होती. लोकांना कायदा हातात घेऊन कायदा-सुव्यवस्था बिघडविणे आणि सुप्रीम कोर्ट किंवा संसदेसारख्या संस्थांना अस्थिर करणे अमान्य आहे.

भारतात सत्ता परिवर्तनासाठी बांग्लादेशामधील आंदोलनातून जे लोक प्रेरणा घेतात, ते खूप दुर्दैवी आहे. त्या आंदोलनांचे नेतृत्व केवळ विद्यार्थ्यांनी केले नव्हते, तर एक इस्लामवादी आंदोलनाने त्यांना आपल्या ताब्यात घेतले होते. हिंदूंसह अल्पसंख्याकांवर हल्ले झाले. कोणत्याही लोकशाही देशात हिंसेतून सत्ता परिवर्तनाला जागा नाही. अल्बानिया, पॅरिस किंवा अशा अन्य घटनांपासून शिकण्याची आपल्याला गरज नाही, असेही चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT