US voter fraud : अमेरिकेत दोन भारतीयांकडून बोगस मतदान; नागरिक नसतानाही नोंदणी केल्याचा आरोप

Indians in US, California voter fraud, 2024 US presidential election : फसवणुकीचा आरोप असलेले सर्व २८ परदेशी नागिरक असून अमेरिकेत कायदेशीर कायमस्वरूपी रहिवासी किंवा 'ग्रीन कार्ड' धारक आहेत.
Donald Trump
Donald Trump Sarkarnama
Published on: 
Updated on: 

US election fraud case : अमेरिकेत नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हजारो बोगस मतदारांनी मतदान केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामध्ये दोन भारतीयांचाही समोवश असल्याची माहिती समोर आली आहे. कॅलिफोर्नियामध्ये निवडणूक फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या २८ ग्रीन कार्ड धारकांमध्ये या दोन भारतीयांचा समावेश आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने सोमवारी एका निवेदनातून ही माहिती दिल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. विभागाच्या माहितीनुसार, अमनदीप कौर आणि कमलेश शाह यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. फसवणुकीचा आरोप असलेल्या २८ जणांपैकी ११ जणांना 'ऑपरेशन प्रोटेक्ट द व्होट' अंतर्गत सोमवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये या दोन भारतीयांचा समावेश आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही.

दरम्यान, शाह हे सॅक्रामेंटोचे तर कौर हे रँचो पालोस व्हर्डेस येथील रहिवासी आहेत. अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या कौर यांनी डिसेंबर २०२२ मध्ये मतदार म्हणून नोंदणी केली होती. त्यांनी निवडणुकीत मतदानही केले होते. तर शाह यांनी निवडणुकीच्या दिवशी मतदार म्हणून नोंदणी आणि मतदानही केले, अशी माहिती न्याय विभागाने दिली आहे.

Donald Trump
Yusuf Pathan news : पक्षांतर करणाऱ्या बंडखोर खासदाराला गुजरातमध्ये लॉटरी; तब्बल 14 वर्षे वादात असलेली सरकारी जमीन देण्याचा निर्णय

फसवणुकीचा आरोप असलेले सर्व २८ परदेशी नागिरक असून अमेरिकेत कायदेशीर कायमस्वरूपी रहिवासी किंवा 'ग्रीन कार्ड' धारक आहेत. त्यांना कायदेशीर रहिवासी असल्याचा दर्जा मिळाला असला तरी अमेरिकेचे नागरिकत्व नसल्याने निवडणुकीत मतदान करता येत नाही, असेही न्याय विभागाने स्पष्ट केले आहे.

Donald Trump
Satej Patil Gokul election : विधानसभा निवडणुकीपासून 'अजिंक्यतारा' होते सामसूम; आज बंटी पाटलांनी तीन निवडणुकांचा काढला वचपा...

नागरिकत्वाच्या अर्जात खोटी माहिती देण्यासह फसवणूक करून मतदार नोंदणी आणि मतदानाचे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतुद आहे. असे सुमारे २० हजारांहून अधिक जण मतदार म्हणून नोंदणी केलेल्यांच्या यादीत आहेत. न्याय विभागाने वर्षभरात आतापर्यंत विविध प्रकरणांमध्ये ९० जणांवर आरोप ठेवले होते, त्यापैकी ५० जणांनी नागरिकत्व नसताना मतदान केल्याचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com