Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News: राऊतांची अडचण वाढणार, मराठा क्रांती मोर्चाकडून होणार तक्रार दाखल!

Sanjay Raut : भाजपनकडून या मोर्चाचे फोटो शेअर करत, गर्दीच झाली नसल्याचा दावा

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut News: शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray ) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारीच्या महामोर्चासंबंधी ट्वीट केलेल्या व्हिडिओच्या दाव्यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चाचा एक व्हिडीओ रावतांनी महामोर्चाचा व्हिडीओ असल्याचे ट्वीट केल्यामुळे राऊत यांच्यावर आता पोलिस तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

रोजी महाविकास आघाडीने शनिवारी 17 डिसेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेत्यांच्या महापुरुषांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यांविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला अल्प प्रतिसाद मिळाला, असा दावा भाजप व शिंदे गटाने केला. भाजपनकडून या मोर्चाचे फोटो शेअर करत, गर्दीच झाली नसल्याचा दावा केला गेला. दुसरीकड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचा नॅनो मोर्चा'असा उल्लेख करत 'खिल्ली' उडवली होती.

फडणवीसांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना, महाविकास आघाडीनकडून काही, फोटो, काही व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. मात्र,संजय राऊत यांनी महामोर्चाचा ट्विट केलेला व्हिडीओ हा आता मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ आहे, असा दावा केला जात आहे. यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राऊत यांच्यावर कारवाईचा बडगा उचलणार आहे. राऊंताविरोधात आज मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाकडून मिळत आहे. सकाळी 11 वाजता मुंबईतीलशिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT