Sanjay Raut News :  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News : संजय राऊतांनी ठोकला सोमय्यांवर दावा; लवकरच सुनावणी होणार..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे खासदार किरीट सोमय्या (KIrit Somayya) यांच्यातली लढाई सर्वश्रुत आहे. याच्यात कधी जोरदार टीका टिपण्णीची होत असते. तर कधी ते एकमेकांना कायदाच्या कचाट्यात अडकवतात. सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. याच प्रकरणात सोमय्या यांनी राऊतांवर मानहानी दावा केला होता. यामुळे राऊत-सोमय्या सातत्याने एकमेकांवर आरोप केला जातो.

खासदार संजय राऊत यांनी आता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात कोर्टात धाव घेणार आहे. संजय राऊत यांचनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. मुलुंड महानगर दंडाधिकारी कोर्टात राऊत यांनी दावा दाखल केला आहे. राऊत यांनी हा फौजदारी दावा दाखल केला आहे.

किरीट सोमय्या यांनी वेळो वेळी संजय राऊत यांच्या संदर्भात केलेली विधाने,आक्षेपार्ह आणि बदनामी कारक ट्विट प्रकरणी, तसेच राऊत यांना सुजीत पाटकरचा पार्टनर सांगून सोमय्या हे मुद्दाम बदनामी करत असल्याचा याचिकेत आरोप आहे. किरीट सोमय्या यांनी ९ ऑगस्ट २०२२, २४ ऑगस्ट २०२२, २२ जानेवारी २०२२ आणि १३ जून २०२२ रोजी राऊत विरोधात केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचा याचिकेत उल्लेख आहे. यावरलवकरच सुनावणी अपेक्षित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT