Alandi Ashadhi Wari: वारकऱ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करून पोलिसांवर कारवाई करा; राष्ट्रवादीची मागणी

Pune NCP : वारकऱ्यांना मारहाण करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?; राष्ट्रवादीचा सवाल
Alandi Ashadhi Wari and NCP
Alandi Ashadhi Wari and NCP Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात पोलिसांनी काल लाठीमार केल्याचा दावा वारकऱ्यांनी केला. तर, फक्त झटापट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एकूणच पोलिसांनी वारकऱ्यांना मारहाण केल्याने याप्रकरणी चौकशी करून दोषी पोलिसांवर कडक कारवाईची मागणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने आज केली आहे.

पोलिसांनी वारकऱ्यांना मारहाण केल्याने वारीला गालबोट लागल्याचे सांगत आजपर्यंत अशी घटना कधीच घडली नव्हती, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओत पोलीस वारकऱ्यांना मारहाण करताना दिसत आहेत, असे ते म्हणाले.

Alandi Ashadhi Wari and NCP
Alandi Warkari Viral Video: आम्हाला एकांतात नेऊन मारलं ? ; वारकऱ्यांचा गंभीर आरोप ; आळंदीत नेमकं काय घडलं ; Video व्हायरल..

पोलिसांनी नियोजन करणे आवश्यक होते. पण, त्यांच्याकडे नियोजनाचा अभाव दिसला, ते वारकऱ्यांना समजून सांगण्यात कमी पडले, त्यांनी सुरक्षेचा बाऊ केला, परिणामी पालखी सोहळ्यात आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले, अशा शब्दांत त्यांनी पोलिसांवर कोरडे ओढले आहेत.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?

वारकऱ्यांना मारहाण करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?,अशी विचारणा राष्ट्रवादीचे कामगार नेते, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी या घटनेचा निषेध करताना केली.

यापूर्वीही वारकऱी पोलीस आणि प्रशासन यांच्यामध्ये मतभेद झाले, वादविवाद झाले. मात्र, कालच्यासारखा काळा दिवस कधी पाहिला नव्हता, पोलिसांकरवी लाठीचार्ज कधी झाला नव्हता, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

Alandi Ashadhi Wari and NCP
Sanjay Raut's Allegation On BJP: आळंदीत औरंग्याची औलाद कशी निर्माण झाली ? ; वारकऱ्यांच्या हल्ल्यांवरुन राऊत संतप्त

वारकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून न घेताच दबंगगिरी करत पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यातून शिंदे -फडणवीस सरकारचे नियंत्रण पोलिसावरती राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये, म्हणून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com