Mumbai News: हक्कभंगाची नोटीस मिळाली तेव्हा मी मुंबईत नव्हतो. त्यामुळे उत्तर देऊ शकलो नाही. सणामुळे दोन दिवस विधीमंडळालाही सुट्ट्या होत्या. आता हक्कभंगासंदर्भात माझ्या विधीमंडळातील सहकारी, अंबादास दानवे, अनिल परब, भास्कर जाधव यांच्याशी चर्चा करुन त्यासंदर्भात काय प्रक्रिया असते ते माहिती करुन घेऊन मी नोटीसीला उत्तर देईल, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग नोटीसीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला 'चोरमंडळ' असं म्हटल्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचे प्रकरण केंद्रांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मुळे संजय राऊतांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे. असे असतानाच याबाबत त्यांना विचारले असता, संजय राऊतांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
"पण मी पुन्हा सांगतो, विधीमंडळाचा अपमान होईल, किंवा हक्कभंग होईल असं कोणतही विधान मी केलेलं नाही. एका विशिष्ट गटापुरतचं माझं विधान मर्यादित आहे. त्या गटासंदर्भात मी जो शब्द वापरला चोरमंडळ तो शब्द योग्यच आहे आणि हे आख्खा महाराष्ट्र म्हणतो. व्यापीठावरुन त्यांच्याबद्दल बोललं जातयं. त्यामुळे संपूर्ण विधीमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद या संपू्र्ण सभागृहाला अशा प्रकारचं विधान करण हे कधीच शक्य नाही.'' असही त्यांनी ठामपणे सांगितल आहे.
या देशातली आणि राज्यातली परिस्थिती खूप गंभीर आहे. जर तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल तर तुम्हाला गुन्हेगार किंवा देशद्रोही म्हटलं जातयं किंबहुना लोक आता घाबरु लागले आहेत. पण आम्ही घाबरत नाही. या लोकांनी बेकायदेशीरपणे चिन्ह आणि नाव काढून घेतलं तरीही शिवसैनिक रस्त्यावर लढतोय.
कालही बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या घरावर धाडी पडल्या. दिल्लीत मंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. मग गौतम अदानीला नोटीस तरी बजावली का, त्यांनी मोदी-शहांच्या मततीने संपूर्ण लुटला, त्याला साधी नोटीस तरी बजावली का, आणि तुम्ही धाडी कोणावर टाकताय तर विरोधी पक्षावर. त्यामुळे जे असत्य आहे त्याविरोधात आम्ही उभे राहणार, असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं आहे
आमच्या मित्रानां भांग पाजली गेली असा आरोप काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, कोणी पाजली, त्यांनीच का असा प्रतिप्रश्न विचारुन त्यांनी या आरोपाची खिल्ली उडवली. पण महाराष्ट्रात भांग पिऊन सत्तेवर कोण आलयं हे त्यांची भांग उतरली की त्यांची सत्ता जाईल. आम्ही पूर्णपणे शुद्धीत आहोत असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.