Nashik News: सध्याच्या कांदा उत्पादकांच्या (Farmers) समस्येचे मुळ केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) धोरणात आहे. या सरकारला (Centre Government) शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नाही. त्यांच्या मंत्र्यांनी तर शेतकऱ्यांची थट्टा केली. शेतकरी योग्य वेळी त्याचे परिणाम केंद्रातील सरकारला दाखवून देतील, असा इशारा शेतकरी संघटनेचे (Farmers Organisation) ज्येष्ठ नेते अर्जुन बोराडे (Arjun Borade) यांनी दिला आहे. (Centre Governments policy towards onion export, farmers are in trouble)
शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन बोराडे म्हणाले, केंद्र शासनाच्या कांदा निर्यातीबाबतच्या धरसोड वृत्तीच्या धोरणामुळे परदेशी बाजारपेठा गमावल्या आहेत. बांगलादेशसमवेत कांदा निर्यातीचा झालेला दोन वर्षाचा करार मोदी सरकारने मोडीत काढला.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शेतकऱ्यांच्या व्यथेची थट्टा केल्याची टीका त्यांनी केली. घामाचे दाम मिळविण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका ठेवा, असे त्यांनी नमूद केले. यावेळी कांदा व्यापारी अतुल शाह, नारायण पोटे यांनी मनोगत व्यक्त केले.
कांदा या परिसरातील प्रमुख पिक आहे. सध्याचा कांदा साठवताही येत नाही आणि भाव नसल्याने विकताही येत नाही. त्यातून कांद्यासह इतर शेतमालाच्या बाजारभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतकरी उद्विग्न झाल्याचे चित्र आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून कोणत्याही शेतमालाला अपेक्षित दाम मिळत नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष आहे. शेतकरी कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, लग्न आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणारा पैसाही शेती व्यवसायात उपलब्ध होत नसल्याने आर्थिक समीकरणे कोलमडून गेली आहेत. दैनंदिन गरजा व खासगी, सरकारी बँकांची कर्जे चुकती करण्यासाठी कुठलाही पर्याय उरलेला नाही.
शासन शेतकरीहितापेक्षा ग्राहकहिताला प्राधान्य देत आहे. याबाबत आता लोकप्रतिनिधींना राज्यातील व केंद्रातील सरकारकडे शेतकऱ्यांच्या समस्या नेमकेपणाने मांडाव्यात. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे गांभिर्य निर्माण व्हावे यासाठी दबाव टाकावा. अन्यथा आगामी काही काळ सध्याचा कांदा नाशवंत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक तीव्र होतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.