Sanjay Raut News
Sanjay Raut News  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News : लोकसभेच्या रणधुमाळीत संजय राऊतांना झटका; निकटवर्तीयाच्या संपत्तीवर ईडीची जप्ती...

Chetan Zadpe

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांचे जवळचे असणारे प्रवीण राऊत यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडली आहे. 'पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात' त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलत त्यांची मालमत्ता ईडीकडून तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. प्रवीण राऊत यांची तब्बल 73.62 कोटींच्या मालमत्तेवर टाच आली आहे. तर आजपर्यंत पत्राचाळ प्रकरणात एकूण 116.27 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पीएमएलए कायदा 2002 च्या अंतर्गत हा कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

मुंबई शहरातील गोरेगाव या ठिकाणी हा पत्राचाळीत म्हाडाच्या जमीनीवर हा पुनर्विकास प्रकल्प होता. या ठिकाणी प्रवीण राऊत यांची कंपनी असलेल्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळ पुनर्विकासाचं काम दिलं गेलं. पण या प्रकल्प अंतर्गत येणारा काही भाग परस्पर खासगी बिल्डर्सना विकल्याचा आरोप त्यांचावर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कंपनीचे शेअर्स विकले -

पत्राचाळीत रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण राऊत यांच्यावर केला गेला आहे. एकूण तीन हजार फ्लॅट बांधायचे होते. मात्र तीन हजार पैकी 672 फ्लॅट इथल्या भाडेकरुंना द्यायचे होते तर उर्वरित फ्लॅट्स म्हाडा (Mhada) आणि संबंधित विकासकांना यांना मिळणार होते. मात्र प्रवीण राऊत यांनी कंपनीचे शेअर्स एचडीआयला विकून टाकले. तर या प्रकल्पातील भूखंडाचा काही भाग हा खासगी बिल्डर्संना देऊन टाकला.

एकूण 116 कोटींची मालमत्ता जप्त -

ईडीने (ED Action) यापूर्वीच प्रवीण राऊत यांच्या अलिबागमधील संपत्तीवर टाच आणली होती. यामध्ये आठ वेगवेगळ्या ठिकाणची जमीन आणि वर्षा राऊत यांच्या फ्लॅटचाही समावेश आहे. या प्रकरणात आजपर्यंत एकूण 116 कोटी पेक्षा अधिक किंमतीची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये प्रणीव राऊत यांच्या बरोबरच आणखी इतर भागिदार यांचे पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे इथल्या जमीनींचा देखील समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT