Sharad Pawar, Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar-Sanjay Raut : तयारी सुरू, या माणसाची खरंच कमाल आहे! शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे सूचक विधान...

Sharad Pawar meeting news : अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर काही दिवसांत शरद पवार यांना पुण्यासह मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Rajanand More

Maharashtra Political News : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृती ठीक नसल्याने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत नाहीत. राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे त्यांनी टाळले आहे. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत नसून भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीसह वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीलाही त्यांनी उपस्थिती लावली होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही बुधवारी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीबाबत राऊतांनी सोशल मीडियात पोस्ट करून माहिती दिली आहे. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे सांगतानाच त्यांनी शरद पवारांच्या दृढ इच्छाशक्तीवरही भाष्य करत सूचक विधान केले आहे.

काय म्हणालेत राऊत?

राऊत यांनी म्हटले आहे की, ‘’आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली. मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. साहेबांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. अनेक विषयांवर चर्चा झाली. राज्यात फिरण्याची तयारी सुरू आहे. या माणसाची खरंच कमाल आहे.’’

दरम्यान, अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर काही दिवसांत शरद पवार यांना पुण्यासह मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. लवकरच ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होतील, असे संकेत राऊतांनी दिले आहे.

शरद पवार हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांची टर्म ४ एप्रिलला संपत होती. पण नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे पुढील सहा वर्षे ते संसदीय कामकाजात सक्रीय असणार आहेत. मागील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला होता.

त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची घेतलेली शपथ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्य़क्षपदी झालेली निवड, आमदार रोहित पवार यांच्याकडून अजित पवारांच्या घातपाताबाबत उपस्थित केले जाणारे प्रश्न, यावरून राजकारण ढवळून निघाले आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT