

Maharashtra Government news : महाराष्ट्रातील धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची महसुल व वन विभागात सचिव म्हणून मंगळवारी बदली करण्यात आली. दिव्यांग कल्याण विभागात जवळपास दीड वर्षांतच त्यांनी अनेक बदल केले. प्रामुख्याने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांद्वारे नोकरी मिळविणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. एवढेच नाही तर काम न करता अनुदान लाटणाऱ्या संस्थांही त्यांच्या निशाण्यावर होत्या.
तुकाराम मुंढे यांनी बदलीच्या दोन दिवस आधीच सोशल मीडियात एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओतून त्यांनी दिव्यांग क्षेत्रात काम करत असलेल्या संस्थांना कडक शब्दांत इशारा दिला होता. केवळ कागदोपत्री काम दाखविणाऱ्या संस्थांना या क्षेत्रात काम करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला होता.
मुंढे यांनी व्हिडीओ ऑडिटची पध्दत विभागात सुरू केली होती. यांसह त्यांच्या विविध निर्णयांमुळे संस्थाचालकांमध्ये नाराजी होती, असे सांगितले जाते. पण दिव्यांग व्यक्तींकडून त्यांच्या निर्णयांचे स्वागत केले जात होते. यापार्श्वभूमीवर मुंढे यांची बदली झाल्याने आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहे. मागील २१ वर्षांत त्यांची ही २५ वी बदली ठरली आहे.
व्हिडीओमध्ये काय म्हणाले होत मुंढे?
ज्या संस्थांनी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली नाही किंवा ज्या संस्थांना या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी नोंदणी करून काम करावे. माझ्याकडे अपील येते तेव्हा संस्थांकडून सांगितले जाते की, संस्था खूप चांगले काम करते, मुलांचे सक्षमीकरण झाले आहे, स्कील डेव्हलमेंट, नोकरी मिळत आहे वगैरे. असे झाले असेल तर निश्चितच चांगले आहे, असे मुंढे यांनी म्हटले होते.
मला काही शंका यायला लागल्या. इथे आल्यानंतर मी नवीन पध्दत सुरू केली आहे. ज्यावेळी काही दावे केले जातात, त्याचे व्हिडीओ ऑडिट करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही व्हिडीओ कॉल करणार. तुम्ही जे सांगतात ते प्रत्यक्षात तिथे आहे का, हे पाहणार. विद्यार्थी आहेत का, शाळा, खोल्या, शिक्षक आहेत, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले होते.
बऱ्यावेळा असे आढळलं की, जसे दावे केले जाता, तशी परिस्थिती तिथं नसते. हे अत्यंत चुकीचे, घृणास्पद आणि अन्यायकारक आहे. अशा जर कुठल्या संस्था असं काम करत असतील, तर कृपया या क्षेत्रात काम करू नका. हे क्षेत्र दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आहे, फायदा कमविण्यासाठी नाही. अनेक संस्था आहेत, ज्या अत्यंत चांगले काम करतात. अनेक संस्था अत्यंत वाईटपध्दतीने केवळ कागदावर दाखवून काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पध्दतीने चालणार नाही. आपल्याला दिव्यांगांचे सक्षमीकरण करायचे आहे, असे IAS मुंढे यांनी व्हिडीओमध्ये म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.