Cm Eknath Shinde News Sarkarnama
मुंबई

Thane News : 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांसाठी रस्ते मोकळे केले, ठाणे पोलिसांची चमचेगिरी'

Sachin Fulpagare

Maharashtra Politics News : ठाणे वाहतूक पोलिसांच्या निर्णयावरून आता राजकारण सुरू झालं आहे. शिवसेना नेते (उद्धव ठाकरे गट ) संजय राऊत यांनी पोलिस-प्रशासनासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.

'हा पोलिसांचा अतिउत्साहीपणा आहे. जे सध्याचे औट घटकेचे व्हिआयपी आहेत, त्यांनी हे सांगितलं असेल, असं मी म्हणणार नाही. पण पोलीस आणि प्रशासनामध्ये चमचेगिरी आणि चाटुगिरीची एक स्पर्धा सुरू आहे. याचं ठाण्यातील एक उदाहरण आहे', असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठाण्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

'ठाण्यातील अनेक रस्ते वळण्यात आले आहेत. अनेक युटर्न बंद केले आहेत. ठाण्यात अनेक रस्ते जाण्या-येण्याचे नागरिकांसाठी बंद केले आहेत. त्याची कारणं शोधली पाहिजेत. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांसाठी येण्या-जाण्यासाठी रस्ते मोकळे ठेवले आहेत, पोलीस उपायुक्तांच्या एका परिपत्रकावरून आम्हाला कळलंय. त्या रस्त्यांवर ट्रॅफिक असता कामा नये. अशा प्रकारे अध्यादेश कधी कुणा काढले नव्हते. हे आता काढले जात आहेत', असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

'प्रशासन, पोलीस हे सुद्धा एकप्रकारे चाटुगिरी करतायेत. या महाराष्ट्रात हिंसाचार, हत्या, जाळपोळ, महिलांवर अत्याचार होतायेत, भ्रष्टाचार सुरू आहे तिकडे पोलिसांचं लक्ष नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांना जाण्या-येण्यासाठी रस्ता मोकळा हवा यासाठी यंत्रणा राबवली जातेय', असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT