Thane News : ठाणे वाहतूक पोलिसांच्या एका निर्णयाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवास स्थानासमोरील सर्व्हिस रोड वाहतूक पोलिसांनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत एक पत्र पोलिसांनी काढले होते. यावर खासदार शिंदे यांनी थेट पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही, असं त्यांनी पत्रात म्हटले आहे. (Latest Marathi News)
ठाणे पोलिस वाहतूक शाखेने एक परिपत्रक जाहीर केले आहे. आमचे निवासस्थान असलेल्या लुईसवाडी भागात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबासाठी म्हणजे आमच्यासाठी वाहतुकीत बदले केल्याचा उल्लेख आहे. माझ्या नावाचाही यामध्ये उल्लेख केला गेला आहे. आम्ही अशा कोणत्याही पद्धतीची मागणी केली नव्हती. तसेच असा निर्णय घेण्यापूर्वी आम्हालाही कळवले गेले नाही, असे खासदार शिंदे म्हणाले.
श्रीकांत शिंदे म्हणाले, अतिउत्साही वाहतूक पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी याबाबतचे पत्र काढले आहे. यामुळे आमच्या कुटुंबाची नाहक बदनामी होत आहे. चूक पोलिसांनी केली आहे आणि त्याचे खापर आमच्या माथी, अशी परिस्थिती उद्भवली आहे. आमचे येणे -जाणे सुकर व्हावे, यासाठी नागरिकांचा रस्ता अडवण्याचा अधिकार आम्हाला नाही, असे व्हीआयपी कल्चर आम्हाला मान्य होणारे नाही, असेही शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.