Mumbai News: विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, "शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यामुळे आमचं मन दुखावलं," अशी प्रतिक्रिया दिली. राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे.
30 वर्षांनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल विधान भवनात आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे कॅबिनेटची बैठक सोडून शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते. काही वेळ चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे हे पुन्हा बैठकीसाठी निघून गेले. , या भेटीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे- शरद पवार यांच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी माध्यमासमोर याबाबत खंत बोलून दाखवली. याबाबत आम्ही पवार यांच्याशी करु, असे राऊत म्हणाले.
शरद पवार हे विधान भवनात त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात बैठक घेऊ शकले असते. पण त्यांनी ज्यांनी सरकार पाडलं त्यांच्याच छताखाली बैठक घेतली. पवारांनी शिंदेच्या दालनात जाऊन बैठक घेतल्यानं आमचं मन दुखावलं आहे. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, असे राऊत म्हणाले.
पवारांनी अन्य ठिकाणी बैठक घेऊ शकले असते. बैठक घेण्यासाठी संपूर्ण विधान भवन ओस पडले होते का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित होते. अशा घटनांमुळे राजकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे राऊत म्हणाले. राऊतांच्या या विधानामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
शरद पवार हे काल दुपारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीसाठी विधान भवनात आले होते. तिथून ते थेट एकनाथ शिंदे यांच्या केबिनच्या दिशेने गेले. पवारांसोबत पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे होते.
पवार आपल्या कॅबिनमध्ये आले असल्याची माहिती शिंदे यांनी मिळाली तेव्हा ते कॅबिनेटमध्ये होते. शरद पवार आल्याचे समजताच शिंदे हे कॅबिनेटची बैठक सोडून तातडीने त्यांच्या दालनात आहे. त्यांनी पवारांना शाल, पुष्पगुच्छ देत स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर शिंदे हे पुन्हा कॅबिनेटच्या बैठकीला निघून गेले. महाविकास आघाडी स्थापन करण्यात संजय राऊत आणि शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. दोन्ही नेत्यांमुळेच आघाडी स्थापन झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.