MP Sanjay Raut
MP Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : ठाकरे-शिंदे गट येतील असं केसरकर का म्हणाले? संजय राऊतांनी सांगितलं नेमकं कारण

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut On Deepak Kesarkar : शिंदे गटाचे नेते व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उध्दव ठाकरेंनी जर आत्मपरीक्षण केलं तर शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही असं विधान केलं होतं.केसरकर यांच्या विधानामुळे ठाकरेसह शिंदे गटात देखील खळबळ उडाली आहे. यावरुनच आता ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केसरकरांच्या शिवसेना एकत्र येण्याच्या विधानामागचं नेमकं कारण सांगितलं आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते.राऊत म्हणाले, दीपक केसरकर यांनी जे दोन्ही गटाच्या एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यावरुन शिंदे गटात आणखी बरेच गटतट निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्यांच्याच गटातील अब्दुल सत्तार यांनी देखील त्यांच्याच गटातील लोक माझा करेक्ट कार्यक्रम करत असल्याचं सांगितलं होतं. यावरुनच तुम्ही त्यांच्या विधानाचा अर्थ समजून घ्या. त्यांच्या गटात देखील वादविवाद सुरु असल्याचं तुम्हांला कायमच सांगितलं आहे.

तसेच केसरकरांची एकत्र येण्याची भाषा हे त्यांच्या गटातील वैफल्य आहे. फ्रेब्रुवारीमध्ये राज्यातील सरकार कोसळेल असं विधान जे मी केलं होतं. त्यामुळेच ते आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत. याचवेळी दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवं असा सल्ला देखील दिला आहे.

लवकरच शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील कारण आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, हा गटही टिकणार नाही. यापैकी बरेच लोकं भाजपात प्रवेश करणार असून तेच त्यांचं अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना आता शिवसेना स्वीकारणार नाही असेही राऊतांनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT